जिल्ह्यातील १२९३ शाळांची होणार चुलीच्या धुरातून मुक्ती (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:29 AM2021-04-01T04:29:56+5:302021-04-01T04:29:56+5:30
गोंदिया : विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी शासनाने शालेय पोषण आहाराची योजना अमलात आणली. या योजनेतून गोंदिया जिल्ह्यातील वर्ग १ ...
गोंदिया : विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी शासनाने शालेय पोषण आहाराची योजना अमलात आणली. या योजनेतून गोंदिया जिल्ह्यातील वर्ग १ ते ५ व वर्ग ६ ते ८ अशा १३४५ शाळांमधून शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येते. परंतु शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी लाकडांचाच वापर करावा लागतो. त्यामुळे शाळेच्या आवारात शालेय पोषण आहार शिजवितांना चुलीतून धूर निघत होता. या धुरावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने आता झालेय पोषण आहार चुलीवर शिजविणाऱ्या शाळांना गॅस कनेक्शन देण्याचे ठरिवले आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील १२९३ शाळांना गॅस कनेक्शन दिले जात असल्याने या शाळा धूरमुक्त होणार आहेत. गोंदिया जिल्ह्यातील १३४५ शाळांतून शालेय पोषण आहार दिला जातो. यापैकी १२९३ शाळांत चुलीवरच पोषण आहार शिजविला जात होता. परंतु आता गॅसवर हा पोषण आहार शिजविला जाणार आहे.
................................
जिल्ह्यातील एकूण शाळा-१३४५
गॅस कनेक्शन नसलेल्या शाळा-१२९३
.............
गॅस कनेक्शन नसलेल्या तालुकानिहाय शाळा संख्या
आमगाव-१२६
सालेकसा-१३१
देवरी-१६९
सडक-अर्जुनी-१३५
अर्जुनी-मोरगाव-१७४
गोरेगाव-१३७
तिरोडा-१७१
गोंदिया-२५०
.......
कोट
चुलीवर शालेय पोषण आहार शिजवून विद्यार्थ्यांना दिला जायचा. मात्र आता शासन गॅस कनेक्शन नसलेल्या शाळांना गॅस कनेक्शन देत असल्याने या शाळांतील धूर कायमचाच बंद होणार आहे. स्वयंपाकी महिलांचा चूल फुकण्याचा त्रास कमी होणार आहे.
- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया.