तीन चोरट्यांकडून १३ मोटारसायकल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:46+5:302021-05-31T04:21:46+5:30

गोंदिया : विविध ठिकाणांहून चोरीला गेलेल्या १३ मोटारसायकली डुग्गीपार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई शनिवारी (दि.२९) रात्री करण्यात ...

13 motorcycles seized from three thieves | तीन चोरट्यांकडून १३ मोटारसायकल जप्त

तीन चोरट्यांकडून १३ मोटारसायकल जप्त

Next

गोंदिया : विविध ठिकाणांहून चोरीला गेलेल्या १३ मोटारसायकली डुग्गीपार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई शनिवारी (दि.२९) रात्री करण्यात आली असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गुरुवारी (दि.२७) रात्री सडक-अर्जुनी येथील न्यू केजीएन मोटारसायकल रिपेरिंग दुकानासमोर विनोद भांडारकर (रा.कोसबी) यांनी दुरुस्तीकरिता ठेवलेली एमएच ३१-डीजी ५५६४ क्रमांकाची मोटारसायकल चोरीला गेली होती. या संदर्भात तौशीक कलीम शेख (३२,रा. सडक-अर्जुनी) यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार येथे भादंविच्या कलम ३७९ अन्वये दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करताना, डुग्गीपार पोलिसांना एक दिवसापूर्वी सुदर्शन केवळराम बिसेन (रा.हिरापूर) याच्याकडे एक वाहन असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर हिरापूर येथे बिसेन याच्या राहत्या घरी एमएच ३१-डीजी ५५६४ क्रमांकाचे वाहन आढळले. त्या वाहनासंदर्भात विचारणा केली असता, ही मोटारसायकल सडक-अर्जुनी येथील केजीएन मोटार सायकल दुरुस्ती दुकानासमोरून चोरी केल्याची माहिती त्याने दिली.

बिसेन याने रोहित सावलराम पुंडे व बंटी उर्फ उमेश दुर्गाप्रसाद बोपचे (दोन्ही रा.सोनी) यांच्यासोबत चोरी करून ती मोटारसायकल आणली असल्याचे सांगितले. यापूर्वी गोलू उर्फ दिलीप देवचंद पटले (रा.मानेगाव) व ते तिघे अशा चौघांनी मोटारसायकली चोरी केल्या आहेत, असेही सांगितले. यावर आरोपी रोहित पुंडे, बंटी बोपचे व दिलीप पटले यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांचा मोटारसायकल चोरीमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरी करून आणलेल्या १३ मोटारसायकली गोरेगाव व तिरोडा हद्दीतून जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस हवालदार हरीश्चंद्र शेंडे, जगदेश्वर बिसेन, पोलीस नायक सुरेश चंद्रिकापुरे, पोलीस शिपाई सुनील डहाके, घनश्याम मुळे यांनी केली आहे.

Web Title: 13 motorcycles seized from three thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.