१३ पोलिसांना पोलीस महासंचालकांचे पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 08:28 PM2019-04-26T20:28:19+5:302019-04-26T20:28:48+5:30
गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असून जिल्ह्यात पोलीस विभागात काम करणाऱ्या १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानपदक २३ एप्रिल रोजी जाहीर झाले आहे. या अधिकारी-कर्मचारºयांना १ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात हे पदक प्रदान केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असून जिल्ह्यात पोलीस विभागात काम करणाऱ्या १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानपदक २३ एप्रिल रोजी जाहीर झाले आहे. या अधिकारी-कर्मचारºयांना १ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात हे पदक प्रदान केले जाणार आहे.
या पदकाचे गोंदिया जिल्ह्यातील १३ अधिकारी, कर्मचारी मानकरी ठरले आहेत.
त्यात सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार नितीन तोमर, हवालदार किशोर कटारे, भगीरथ पुसाम, इंसाराम देव्हारी, इमरान काझी, परमानंद नंदागवळी, नायक पोलीस शिपाई रमेश माहुर्ले, देवेंद्र काटेंगे, जयेंद्र उकरे, विनोदकुमार कल्लो, संजय कटरे व मनिष तुरकर यांचा समावेश आहे.