आयसोलेशन कक्षात १३२ जणांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:00 AM2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:00:25+5:30

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एक आणि आमगाव तालुक्यातील एक असे दोन रुग्ण मंगळवारी पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाने या दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेवून त्यांना गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील आयसोलेशन कक्षात दाखल केले.

132 people are undergoing treatment in the isolation room | आयसोलेशन कक्षात १३२ जणांवर उपचार सुरू

आयसोलेशन कक्षात १३२ जणांवर उपचार सुरू

Next
ठळक मुद्दे३७० जणांचे स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह : ९६ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मंगळवारी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणि कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे असणाऱ्या १३२ जणांना गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल बुधवारी (दि.२०) प्राप्त झाला नव्हता. जिल्ह्यात नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली नव्हती.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एक आणि आमगाव तालुक्यातील एक असे दोन रुग्ण मंगळवारी पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाने या दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेवून त्यांना गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील आयसोलेशन कक्षात दाखल केले.
जिल्ह्यातून आत्तापर्यंत एकूण ४६८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत ३७२ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून दोन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आणि ३७० जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. ९६ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयला प्राप्त व्हायचा आहे.
सध्या गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील आयसोलेशन कक्षात १३२ जण उपचार घेत आहे. तर एम. एस. आयुर्वेद कॉलेज कुडवा १, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय १, भवभूती महाविद्यालय आमगाव १ असे एकूण १३२ जणांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहे.
जिल्ह्यातील ९६ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप नागपूर येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा असून तो गुरूवारी प्राप्त होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सात क्वारंटाईन कक्षात ६३ दाखल
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने व बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाºया नागरिकांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन ठेवले जात आहे. सध्या जिल्ह्यातील सात शासकीय क्वारंटाईन कक्षात ६३ जण उपचार घेत आहेत. यात चांदोरी ४, लईटोला ५, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट नगर परिषद तिरोडा १०, बिर्सी उपकेंद्र ७, समाजकल्याण शासकीय आश्रम शाळा इळदा २६, समाजकल्याण शासकीय आश्रम शाळा डव्वा ७, जलराम लॉन ४ अशा एकूण ६३ जणांवर उपचार सुरू आहे.
आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार
३९ दिवस कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्यास काही प्रमाणात प्रशासनाचे दुर्लक्ष सुध्दा कारणीभूत आहे. अनेक ठिकाणी क्वारंटाईन कक्ष तयार करण्यात आले आहे. मात्र त्या ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव असल्याची माहिती आहे. तर कोरोना विषयक माहिती अपडेट करण्यासाठी आरोग्य विभागाची दररोज धावपळ होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभार देखील पुढे येत आहे.

Web Title: 132 people are undergoing treatment in the isolation room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.