कोरोनाच्या चाचणीसाठी १४ किमीची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 05:00 AM2020-11-22T05:00:00+5:302020-11-22T05:00:14+5:30
गोरेगाव तालुक्यात ९ ते १२ वीच्या एकूण ३५ शाळा असून यामध्ये ३०३ शिक्षक आणि १४१ कर्मचारी कार्यरत होणार आहे. या सर्वांना कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वी कोरोनाची चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. मात्र दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने कमी कालावधीत चाचण्या कश्या होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गोरेगाव येथील बंद केलेले कोविड केअर सेंटर आणि चाचणी केंद्र सुरु करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.
दिलीप चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव: गोरेगाव : तालुक्यातील गणखैरा येथील किरसान इंटरनॅशनल पब्लीक स्कूलमध्ये सहा महिन्यांपूर्वी कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली होती. या कोविड सेंटरवर गोरेगाव तालुक्यासह गणखैरा परिसरातील नागरिक कोरोना चाचणीसाठी येत होते. या कोविड केअर सेंटर सुध्दा होते. मात्र ११ दिवसांपासून हे सेंटर बंद करण्यात आले. त्यामुळे या तालुक्यातील शिक्षकांसह नागरिकांना १४ किमीची पायपीट करीत गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात यावे लागत आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग कमी झाल्याने जिल्ह्यातील तीन कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. मात्र दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच २३ नोव्हेंबरपासून ९ ते १२ वी चे वर्ग सुरु होणार असल्याने शिक्षकांनी कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
त्यामुळे मागील तीन चार दिवसांपासून कोरोना चाचणी करण्यासाठी गोंदिया येथील केटीएस रुग्णालयातील तपासणी केंद्रावर कोरोना चाचणी करणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यातच गोंदिया ते गोरेगाव हे अंतर १४ किमीचे असून गाेरेगाव येथील केंद्र बंद झाल्याने येथील नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.
गोरेगाव तालुक्यात ९ ते १२ वीच्या एकूण ३५ शाळा असून यामध्ये ३०३ शिक्षक आणि १४१ कर्मचारी कार्यरत होणार आहे. या सर्वांना कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वी कोरोनाची चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. मात्र दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने कमी कालावधीत चाचण्या कश्या होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गोरेगाव येथील बंद केलेले कोविड केअर सेंटर आणि चाचणी केंद्र सुरु करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.
दीडशे शिक्षक व कर्मचाऱ्यांची चाचणी
९ ते १२ वीचे वर्ग २३ नाेव्हेंबरपासून सुरु होणार असून यासाठी शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यातंर्गत २० नाेव्हेंबरपर्यंत ११४ शिक्षक व ३३ कर्मचाऱ्यांनी चाचणी केल्याचे प्रमाणपत्र खंडविकास अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे.
९६४ पालकांनी दिले संमतीपत्र
२३ नाेंव्हेबर पासून शाळा सुरु होणार असून यासाठी पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमत्तीपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यातंर्गत २१ नाेव्हेंबरपर्यंत ९६४ पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे संमतीपत्र दिले.