१४२२ शेतकरी झाले बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 06:00 AM2020-02-02T06:00:00+5:302020-02-02T06:00:10+5:30

शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्माननिधी देण्यासाठी ग्रामसेवकांसह शेतकऱ्यांसाठी योजना राबविणारा कृषी विभागही कामाला लागला आहे.यात गोंदिया तालुक्यातील ७ हजार ६०८, तिरोडा ३ हजार ६०७, आमगाव ३ हजार ६०५, सालेकसा ३ हजार ६७७, देवरी ३ हजार ३६२, गोरेगाव ३ हजार ३९०, सडक अर्जुनी ३ हजार २८४, अर्जुनी मोरगाव ३ हजार २३६ असे एकूण ३१ हजार ७६९ शेतकरी या योजनेपासून वंचित होते.

1422 farmers disappeared | १४२२ शेतकरी झाले बेपत्ता

१४२२ शेतकरी झाले बेपत्ता

Next
ठळक मुद्दे३१७६९ शेतकऱ्यांचे आधार अपडेट। पंतप्रधान शेतकरी सन्मानापासून मुकणार?

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील ३३ हजार १९१ शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ अद्याप देण्यात आला नाही. त्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड ऑनलाईन अपडेट नसल्यामुळे त्यांची माहिती त्या पोर्टलवर अपलोड होऊन लिंक झाली नाही. परिणामी जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधी मिळाला नाही. १८ ते २३ जानेवारी या काळात जिल्हा परिषदेच्या कृषी व ग्रामपंचायत विभागाने मेहनत घेऊन ३१ हजार ७६९ शेतकºयांचे आधारकार्ड अपडेट केले. परंतु १ हजार ४२२ शेतकऱ्यांची माहिती ग्रामपंचायतींना मिळू शकली नाही.
पंतप्रधान सन्मान निधी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती ऑनलाईन अपडेट केली जाते. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड जोडले. परंतु अनेक शेतकऱ्यांचे आधारकार्ड अपडेट नसल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ घेता आला नाही. परिणामी जिल्ह्यातील ३३ हजार १९१ शेतकऱ्यांना सन्मान निधी देण्यासाठी शासन तत्पर असल्याचे दाखवित शेतकऱ्यांचे आधारकार्ड त्वरीत अपडेट करा, अशी सूचना ग्रामपंचायतींना देऊन ग्रामसेवकांना ही कामे प्राधान्याने करण्याचे आदेश देण्यात आले होते. गोंदिया तालुक्यातील ६५ शेतकरी, तिरोडा ११४, आमगाव ४२, सालेकसा ३५८, देवरी ३५५, गोरेगाव २३८, सडक-अर्जुनी ४१, अर्जुनी-मोरगाव २०९ व जिल्ह्यातील एकूण १ हजार ४२२ शेतकरी अद्याप ग्रामपंचायतींना सापडले नाहीत.

३१७६९ शेतकºयांचे आधारकार्ड अपटेड
शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्माननिधी देण्यासाठी ग्रामसेवकांसह शेतकऱ्यांसाठी योजना राबविणारा कृषी विभागही कामाला लागला आहे.यात गोंदिया तालुक्यातील ७ हजार ६०८, तिरोडा ३ हजार ६०७, आमगाव ३ हजार ६०५, सालेकसा ३ हजार ६७७, देवरी ३ हजार ३६२, गोरेगाव ३ हजार ३९०, सडक अर्जुनी ३ हजार २८४, अर्जुनी मोरगाव ३ हजार २३६ असे एकूण ३१ हजार ७६९ शेतकरी या योजनेपासून वंचित होते. शासनाने त्यांना सन्मान योजनेचा लाभ मिळावा यासाठी आग्रह धरल्याने १८ ते २३ जानेवारी दरम्यान संपूर्ण शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांचे आधारकार्ड अपटेड करण्याच्या कामात व्यस्त आहे. जिल्ह्यातील एकही शेतकरी पंतप्रधान सन्मान योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. परंतु १४२२ शेतकरी अद्यापही सापडले नाहीत.

Web Title: 1422 farmers disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.