१४४ पोलिसांना स्वगृही परत जाण्याचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 10:00 PM2017-12-23T22:00:24+5:302017-12-23T22:00:44+5:30

पोलिसांनी आता त्यांच्या गृह जिल्ह्यात नियुक्ती मिळावी. यासाठी आंतरजिल्हा बदली करण्याची तयारी पोलीस विभागाची सुरू आहे. या प्रक्रियेत गोंदिया जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलिसांपैकी १४४ पोलीस कर्मचाºयांची आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे.

144 cops to return to the police | १४४ पोलिसांना स्वगृही परत जाण्याचे वेध

१४४ पोलिसांना स्वगृही परत जाण्याचे वेध

Next
ठळक मुद्देस्वीकृत प्रमाणपत्रासाठी पोलीस अधीक्षकांना पाठविले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पोलिसांनी आता त्यांच्या गृह जिल्ह्यात नियुक्ती मिळावी. यासाठी आंतरजिल्हा बदली करण्याची तयारी पोलीस विभागाची सुरू आहे. या प्रक्रियेत गोंदिया जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलिसांपैकी १४४ पोलीस कर्मचाºयांची आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या पोलिसांना स्वगृही जाण्याचे वेध लागल्याचे चित्र आहे.
पोलीस भरतीत कोणत्याही जिल्ह्यातील तरूण कोणत्याही जिल्ह्यात नोकरी मिळविण्याच्या नादात अर्ज करायचा. ज्या जिल्ह्यात सर्वाधीक जागा आहेत. त्या जिल्ह्यात सर्वाधीक जागा भरल्या जायच्या त्या जिल्ह्याकडे स्पर्धा कमी असेल असे गृहीत धरून तरूणांचा कल असायचा. गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यात सुरूवातीला शासनाने मोठ्या प्रमाणात जागा भरल्या होत्या. त्या भरतीत महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून आलेले पोलीस कर्मचारी आता आपल्या गृह जिल्ह्यात परत जाण्यासाठी आंतरजिल्हा बदलीचा मार्गी लागले आहेत. गोंदिया जिल्ह्यात पोलीस विभागात नोकरी करणाºया १४४ जणांनी आंतरजिल्हा बदलीसाठी गोंदियाच्या पोलीस अधिक्षकांना अर्ज केला आहे. त्या लोकांची आंतरजिल्हा बदली करण्यासाठी संबधित जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी अधिस्वीकृती प्रमाणपत्र द्यावे, यासाठी त्यांना १६ डिसेंबर २०१७ ला पत्र पाठविण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यात पोलिसांची जागा रिक्त असतील त्या जिल्ह्यात या बदली मागणाºया पोलिसांना पाठविण्यात येणार आहे.
जिल्हानिहाय बदलीचे असे प्रस्ताव
गोंदिया जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलिसांपैकी भंडारा जिल्ह्यासाठी ३१ अर्ज आले आहेत. पुणे शहर २, नागपूर शहर २३, नागपूर ग्रामीण ४, वर्धा ५, लातूर ५, बीड ५, वाशिम १, सोलापूर ग्रामीण १, बुलढाणा ६, ठाणे ग्रामीण १, अहमदनगर १, नांदेड २, ठाणे शहर १, अमरावती शहर १, औरंगाबाद ग्रामीण १, अमरावती ग्रामीण १, जळगाव १, परभणी १, जालना २, चंद्रपूर ८, नवीमुंबई १, मुंबई शहर २, अकोला ७, हिंगोली २, औरंगाबाद शहर ३, यवतमाळ २४ व सांगली २ असे एकूण १४४ जणांचे आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव आले आहेत.

Web Title: 144 cops to return to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस