पर्यटन विकासासाठी १५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 09:55 PM2018-07-16T21:55:02+5:302018-07-16T21:56:14+5:30

जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नवेगावबांध, प्रतापगड व मुरदोली येथील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी प्रत्येक स्थळाला पाच कोटी प्रमाणे १५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे.

15 crores fund for development of tourism | पर्यटन विकासासाठी १५ कोटींचा निधी

पर्यटन विकासासाठी १५ कोटींचा निधी

Next
ठळक मुद्देजिल्हा ठरणार पर्यटकांसाठी मेजवानी : भूमी अधिग्रहणासाठी पालकमंत्र्यांनी केला दौरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नवेगावबांध, प्रतापगड व मुरदोली येथील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी प्रत्येक स्थळाला पाच कोटी प्रमाणे १५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. शनिवारी (दि.१४) त्यांनी या तिन्ही स्थळांना भेट देऊन जमीन अधिग्रहित करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांसह पाहणी केली आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या ऐतिहासीक प्रतापगड, नवेगावबांध राष्टÑीय उद्यानातही पर्यटन संकुल तर गोरेगाव तालुक्यातील ग्राम मुरदोली येथे जंगल परिसराला लागून असलेल्या तलाव, रोपवाटिका व विश्रामगृह असून निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या जागेचा विकास केला जाणार आहे. यासाठी या तिन्ही स्थळांसाठी प्रत्येकी पाच कोेटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या तिन्ही स्थळांचा विकास राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. मुरदोली येथे सेंटर रेस्टॉरेन्ट, दोन पर्यटक कक्ष, इनफोरमल स्टोरिंग, संरक्षण भिंत, सिक्युरिटी कॅबीन, लॉन, बंधारा, वाहनतळ, पाथवे, पोचमार्ग, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण आदी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. याच धर्तीवर प्रतापगडचाही पर्यटन विकास करण्यात येणार आहे.यासाठी या तिन्ही स्थळांना भेट देऊन भुमी अधिग्रहीत करण्यासाठी पालकमंत्र्यांनी अधिकाºयांसह प्रत्यक्ष पाहणी केली.
याप्रसंगी त्यांनी जमीन अधिग्रहीत करून लवकरात लवकर कामाला सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या. निधी परत जाणार नाही. याची संबंधित अधिकाºयांनी काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. या वेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, उपवनसंरक्षक एस.युवराज, उपजिल्हाधिकारी आंधळे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता छप्परधरे, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वकर्मा, राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक हेडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गाणार, जिल्हा नियोजन अधिकारी भुते, गोरेगावचे उपविभागीय अधिकारी तळपदे, तहसीलदार हिंगे, अर्जुनी-मोरगावचे धनंजय देशमुख, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, प्रतापगडच्या सरपंच अहिल्या वालदे, जि.प. सदस्या रचना गहाणे, नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, नवेगावबांध फाऊंडेशनचे सचिव रामदास बोरकर, दरगाह कमेटीचे सदस्य भोजू लोगडे, विनोद नाकाडे, संदीप कापगते, व्यंकट खोब्रागडे व सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी फाऊंडेशनच्या सदस्यांनी पर्यटन विकासाची कामे लवकारात लवकर सुरू करण्याची मागणी केली.

सात ते आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसरातील मंजूर कामे सात-आठ महिने लोटूनही सुरु झाली नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी या मंजूर कामाकडे हेतु पुरस्सर केलेले दुर्लक्ष व संबंधित विभागांत नसलेला ताळमेळ हा या राष्ट्रीय उद्यानाचा विकास रखडविण्यासाठी कारणीभूत आहे. पालकमंत्र्यांनी यात लक्ष देवून मंजूर कामे सुरु करावी. तसेच त्यांनी खेचून आणलेला निधी खर्च झाला पाहिजे. निधी अखर्चित राहून परत जावू नये. याची काळजी घ्यावी.
-रामदास बोरकर
सचिव, नवेगावबांध फाऊंडेशन

उपवनसंरक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुलातील मंजूर विकास कामे लवकर सुरु करावी. निधी उपलब्ध असताना होणारा विलंब संतापजनक आहे. पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करवून दिला असताना विकासकामे लवकर व्हावीत. मात्र विकासाची गाडी कुठे अडली आहे. याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे. संयुक्त वन व्यवस्थापन समिती अंतर्गत कामे निविदा काढून लवकरच सुरु केली जातील.
-अनिरूद्ध शहारे
अध्यक्ष तथा सरपंच, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, नवेगावबांध

Web Title: 15 crores fund for development of tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.