१५ टक्के बालक मजुरीवर आश्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 09:54 PM2018-06-11T21:54:35+5:302018-06-11T21:54:51+5:30

मागील अनेक वर्षांपासून शासनातर्फे शंभर टक्के पटनोंदणीची मोहीम राबविण्यात येत असून यात बऱ्याच प्रमाणात शासनाला यश आले आहे. तरी प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच १० ते १५ टक्के विद्यार्थी असे असतात की ते एक तर शाळा सोडतात किंवा शाळेत नियमित हजर राहत नाही.

15 percent dependent on laborers | १५ टक्के बालक मजुरीवर आश्रित

१५ टक्के बालक मजुरीवर आश्रित

Next
ठळक मुद्देग्रामीण भागातील विदारक सत्य : शाळेपेक्षा कामाला महत्त्व

विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : मागील अनेक वर्षांपासून शासनातर्फे शंभर टक्के पटनोंदणीची मोहीम राबविण्यात येत असून यात बऱ्याच प्रमाणात शासनाला यश आले आहे. तरी प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच १० ते १५ टक्के विद्यार्थी असे असतात की ते एक तर शाळा सोडतात किंवा शाळेत नियमित हजर राहत नाही. याबद्दल तालुक्यातील विविध भागात संपर्क करीत माहिती घेताना असे दिसले की तालुक्यातील ग्रामीण भागासह मुख्यालयाच्या परिसरातील सुमारे १५ टक्के विद्यार्थी किंवा बालक असे असतात की आजही त्यांच्यावर दारिद्र्य कोट्याचा मार बसत असतो. एकंदरित परिस्थिती अशी निर्माण होते की, त्यांना आपल्या गरजा भागविण्यासाठी तसेच आई-वडीलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी अर्थार्जन करण्याच्या मार्गावर पाऊल टाकावे लागते. परिणामी बाल मजुरीशिवाय दुसरा विकल्प त्यांच्याकडे उरत नाही.
शहरी क्षेत्रात सामान्यत: हॉटेल, जनरल स्टोर्स, चहाटपरी, आॅटो रिपेरिंग सेंटर, इमारत बांधकाम इत्यादी ठिकाणी बाल कामगार बघावयास मिळू शकतात. तसेच कायद्याच्या सक्तीमुळे शहरी भागात काही ठिकाणी बाल कामगारांची संख्या घटली तरी ग्रामीण भागात वेगवेगळ्या स्वरुपात बाल कामगार आपल्याला दिसून येतात. ग्रामीण भागात आजही सायकल दुरुस्ती, जनरल स्टोर्स, वीटभट्टी, खड्डे खोदकाम, हॉटेल, घर बांधकाम, हमाल काम इत्यादी क्षेत्रात नेहमी कमी वयाचे बालक परिश्रम करताना दिसून येतात. या शिवाय काही कामे हंगामी स्वरुपाची असून एवढ्या रकमेत इतके काम करुन द्यायचे असे सुद्धा बाल कामागार बघावयास मिळतात.
शेतीच्या कामात
सगळेच उपयोगी
ग्रामीण भागात सर्वात जास्त परिश्रम करण्याचे क्षेत्र म्हणजे शेती असून या कामात बालमजुरी विरोधक कायदा कधीच उपयोगी पडू शकत नाही. कारण की शेतीच्या कामात अंड्यातल्या पिल्यापासून काठी टेकून चालणारे वृद्धही आपापली भूमिका बजावत हातभार लावतात. आईच्या गर्भात राहिल्यापासून बालक शेतीच्या कामावर जात असतो. अर्थात गर्भस्त स्त्री आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत शेतकरी पती सोबत कामावर जाते. बाळ जन्माला आल्यापासून १५ वर्षाच्या वयापर्यंत शेतीच्या कामात त्याची घरी आणि शेतात कामाची भूमिका असते.
शेतातील रोवणी व कापणी सारख्या महत्वाच्या कामाच्या वेळी घरातील मोठे व कमवते लोक दिवसभर शेतात राबत असताना लहान मुले-मुली घरकाम ते शेतीकाम करण्यात सतत उपयोगी पडतात.
बाल मजुरी करणारी मुले कोणती?
ग्रामीण भागासह शहरी भागाचा विचार करता माहिती गोळा करताना असे दिसून आले की, बाल मजुरी करण्यास बाध्य होणारी बालके ही जास्त करुन वडील हयात नसलेले, आइ-वडील दोन्ही नसलेले, सावत्री आई असलेले, दिवसभर मजुरी करणारे आई-वडील असलेले, निरक्षर आई-वडीलांची मुले, स्थलांतरीत कुटुंबातील मुले, मादक पदार्थांच्या नेशत अडकणारी मुले, आई-वडील कमाविण्यासाठी शहरात गेले आणि मुलांना घरी एकटे सोडून गेल्यावर त्याच बरोबर मुलांकडे लक्ष न घालणारे, नशेच्या धुंदीत राहणारे वडील किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींपासून त्रस्त बालक मजुरी करुन आपल्या गरजा भागविण्यासाठी किंवा मादक पदार्थाचे सेवन करण्यासाठी धडपड करीत असतात. परंतु शिक्षण घेणारे विद्यार्थी व बालके असेही असतात की ते आई-वडीलांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून काम आणि शिक्षण यासाठी वेळेचे नियोजन करुन स्वखर्चाने शिक्षण पूर्ण करण्यासाठी मजुरी करतात. एवढेच नाही तर आई-वडिलांना सुद्धा त्यातून थोडेफार पैशांचे सहकार्य करतात. मजुरी करीत आपल्या गरजा पूर्ण करणाºया बालकांची संख्या भविष्यात कमी होण्यात किती काळ लागेल याचा भविष्यातच पत्ता लागेल.

Web Title: 15 percent dependent on laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.