१५ हजार महिला आत्मनिर्भरतेच्या वाटेवर

By admin | Published: March 8, 2017 12:52 AM2017-03-08T00:52:32+5:302017-03-08T00:52:32+5:30

कोणतेही काम करण्याची तयारी असली आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली की विकासाचा मार्ग प्रशस्त होतो.

15 thousand women on the path of self-reliance | १५ हजार महिला आत्मनिर्भरतेच्या वाटेवर

१५ हजार महिला आत्मनिर्भरतेच्या वाटेवर

Next

सालेकसा तालुक्यात महिला क्रांती : पुरूषप्रधान व्यवसायांवर मिळविला दोन हजार महिलांनी ताबा
कारु टोल्यात सावित्रीच्या लेकींचा स्वावलंबनाचा मार्ग
गोंदिया : कोणतेही काम करण्याची तयारी असली आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली की विकासाचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळेच गोंदिया जिल्ह्यातील मागास, दुर्गम व आदिवासीबहुल असलेल्या सालेकसा तालुक्यातील असंघटित महिलांना बचतगटाच्या माध्यमातून नवी दिशा मिळाली आहे. कारूटोला येथील सावित्रीच्या लेकींनी स्वावलंबनातून प्रगतीचा मार्ग साधला आहे.
महिलांना संघटीत करून त्यांना उद्योग/व्यवसायाचे प्रशिक्षण देवून स्वावलंबनाचा मार्ग दाखिवला तो महिला आर्थिक विकास महामंडळाने. सालेकसा तालुका तसा मागास, नक्षलदृष्ट्या संवेदनशील आण िआदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो. मात्र तालुक्यातील आमगाव-देवरी मार्गावर असलेले कारु टोला नावाचं गाव. १९० कुटुंब असलेल्या कारुटोल्याची लोकसंख्या ७७ इतकी आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने ३० जानेवारी २००३ रोजी गावातील १४ महिलांना एकत्र करु न सावित्रीबाई फुले स्वयंसहायता महिला बचत गटाची स्थापना केली. सुरुवातीला महिन्याला प्रतिमहिला २० रु पये बचत करायच्या, आता ही बचत प्रत्येकीची बचतगटात महिन्याकाठी १५० रुपये होत आहे.
सावित्रीबाई फुले बचतगटातील महिलांना माविमंचे योग्य मार्गदर्शन व वेळोवेळी मिळालेल्या प्रशिक्षणामुळे त्यांच्यात व्यवसाय सुरु करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. गावातील शाळेला आहार पुरवठा करण्यासोबत स्वस्त धान्य दुकान चालविण्याचे काम या बचतगटातील महिला करीत आहे. ५ महिलांनी दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी ३ लाख रु पये कर्ज घेवून म्हशी खरेदी केल्या आहेत. २ महिला भाजीपाला व्यवसाय, ४ महिलांनी शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला असून २ महिलांनी बचतगटाच्या भरोशावर शेतीसुध्दा खरेदी केली आहे. तसेच याच बचतगटातील महिला हळद मशीन व शिवणकामाचा व्यवसाय करुन स्वावलंबी जीवन जगत आहे. सावित्रीबाई बचतगटातील महिलांनी आयसीआयसीआय बँकेचे ७ लाख ५० हजार रु पये कर्ज घेतले. कर्जाची हप्ते त्या वेळीच भरत आहे. संजीवनी ग्रामसंस्थेने या गटाला सामुदायिक गुंतवणूक निधीतून ५० हजार रु पये दिले आहे.
गरीबांची गाय म्हणून ओळख असलेल्या बकरी पालन व्यवसायाला बचतगटातील सर्वच महिलांनी सुरूवात केली. या व्यवसायातून प्रत्येक महिलेला ५००० रु पये नफा मिळाला. या नफ्यातून आपण सक्षमपणे व्यवसाय करु शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला.
सालेकसा येथील लोकसंचालीत साधन केंद्राच्या माध्यमातून जानेवारी २०१४ मध्ये आयसीआयसीआय बँकेचे ३ लक्ष रु पयांचे कर्ज सावित्री बचतगटातील सर्व महिलांनी घेतले. कर्जाची गुंतवणूक त्यांनी विविध व्यवसायात केली. ३६ महिन्यात न चुकता दर महिन्याला १०५०० रुपये याप्रमाणे मासिक किस्तही भरली. त्यानंतर त्यांनी पुन्हा ७ लक्ष ५० हजार रु पये कर्जाची मागणी बँकेकडे केली. बँकेने बचतगटाचा व्यवसाय आणि बँकेकडे केलेली कर्जाची परतफेड बघता मागणीप्रमाणे ७ लक्ष ५० हजार रु पयाचे कर्ज देखील दिले. बचतगटातील ६ महिलांनी दुग्ध व्यवसाय, भाजीपाला, शेळीपालन, कुक्कुटपालन यासाठी या कर्जाचा विनियोग केला. दर मिहन्याला २६ हजार २५० रु पये कर्जाची परतफेड नियमीत करीत असून २४ महिने पूर्ण झाल्यानंतर पुन्हा १५ लक्ष रु पये कर्ज घेण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.
महिला दुग्ध व्यवसाय करीत असल्यामुळे दुधापासून दही, ताक, तुप हे सुध्दा त्या तयार करु न विकत आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचा दर्जा अत्यंत चांगला असून मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळत आहे. बचतगटामुळे सावित्रीबाई फुले बचतगटातील सर्व महिलांना स्वावलंबनाचा मार्ग मिळाला आहे. घरच्या कर्त्या पुरु षाला आर्थिक मदतीचा हात देखील या महिला देत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचं रहाटगाडगं चांगल्याप्रकारे सुरु आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 15 thousand women on the path of self-reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.