चिमुकलीचा लैंगिंक छळ करणाऱ्या नराधमाला १५ वर्षाचा सश्रम कारावास
By नरेश रहिले | Published: February 21, 2024 08:40 PM2024-02-21T20:40:01+5:302024-02-21T20:40:01+5:30
जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचा निकाल: चार हजार रूपये दंडही ठोठावला.
गोंदिया: मालकाच्या ६ वर्षाच्या पुतणीचा लैंगीक छळ करणाऱ्या नंगपूर्रा मुर्री येथील मजुराला जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने १५ वर्षाचा सश्रम कारावास व ४ हजार रूपये दंड ठोठावला. विक्रम उर्फ सन्नी देवसिंग ठाकुर (२४र्रा . नंगपुरा मुर्री, ता.जि. गोंदिया असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश क्रमांक २ एन. डी. खोसे यांनी केली आहे.
आरोपी सन्नी ठाकूर हा पिडीतेच्या घराच्या वरच्या माळयावर थैले तयार करण्याचा कारखान्यात मजुरीने थैले शिवण्याचे काम करीत होता. १ डिसेंबर २०१६ ते १५ डिसेंबर २०१६ या दरम्यान ६ वर्ष ६ महिने वयाच्या चिमुकलीवर एकटेपणाचा फायदा घेऊन आरोपी तिचा लैगिंक छळ करायचा. पिडीतेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी विरुध्द १५ डिसेंबर २०१६ रोजी आरोपी विरूध्द भादंविच्या कलम ३७६ (२) (आय) (एन), बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो कायदा) २०१२ चे कलम ४, ६, ९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मिंलद नवघिरे यांनी केला होता. या प्रकरणात विशेष सरकारी वकील कृष्णा डी पारधी यांनी ७ साक्षदारांची साक्ष नोंदवून घेतली. एकंदरित आरोपीचे वकील व जिल्हा सरकारी वकील महेश एस. चंदवानी यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर जिल्हा न्यायाधीश क्रमांक २ व विशेष सत्र न्यायाधीश एन. डी. खोसे यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा व युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी विक्रम उर्फ सन्नी देवसिंग ठाकुर (२४) रा. नंगपुरा मुर्री,याला शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक निखिल पिगंळे यांच्या मार्गदर्शनात कोर्ट पैरवी पोलीस हवालदार टोमेश्वरी पटले यांनी केली आहे.
अशी सुनावली शिक्षा
बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो कायदा) २०१२ चे कलम ६ अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावास, बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो कायदा) २०१२ चे कलम १० अंतर्गत ५ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावास असा एकुन १५ वर्षाचा सश्रम कारावास व ४ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास प्रत्येकी ३ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.