शिक्षकांना १५०० रूपये नक्षलभत्ता लागू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:24 PM2018-03-24T22:24:19+5:302018-03-24T22:24:19+5:30

शिक्षक समिती शाखा गोंदियाचे शिष्टमंडळाने शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. ६ व्या वेतन आयोगानुसार कमाल मर्यादेत नक्षलभत्ता १५०० रूपये लागू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्य लेखा व वित्त अधिकारी अ. क. मडावी यांनी शिष्टमंडळाला दिले.

1500 rupees will be applied to teachers | शिक्षकांना १५०० रूपये नक्षलभत्ता लागू होणार

शिक्षकांना १५०० रूपये नक्षलभत्ता लागू होणार

Next
ठळक मुद्देवेतनातील तफावत दूर करा : शिक्षक समितीची वित्त अधिकाऱ्यांशी चर्चा

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : शिक्षक समिती शाखा गोंदियाचे शिष्टमंडळाने शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. ६ व्या वेतन आयोगानुसार कमाल मर्यादेत नक्षलभत्ता १५०० रूपये लागू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्य लेखा व वित्त अधिकारी अ. क. मडावी यांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी समितीतर्फे चटोपाध्याय संदर्भातील मुद्दा उपस्थित केला असता फक्त ३ वर्षाचाच गोपनीय अहवाल तपासला जाईल, असे मडावी यांनी सांगितले. जीपीएफ व डिसिपीएसचा हिशेब पावतीसह लवकरच दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.शिक्षण विभागात चौकशी केली असता उच्च परीक्षा परवानगी यादी, संगणक सूट यादी समोरच्या आठवड्यात मंजूर होईल, कायमतेचा लाभ देण्यासंदर्भातील फाईल तयार असून सेवापुस्तीकेतील पहिल्या पानाची झेराक्स नसल्यामुळे सदर फाईल प्रलंबित आहे. इंधन व भाजीपाला खर्च देयक व उर्वरीत धान्यादी माल खरेदीचे बिल पुढील आठवड्यात मंजूर करण्यात येईल. प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने नुकत्याच प्राप्त झालेल्या शासन परिपत्रकान्वये मुकाअ यांना भेटून चर्चा करण्याकरिता शिक्षक समितीचे शिष्टमंडळ जिल्हा परिषद गोंदिया येथे धडकले. परंतु मुकाअ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होत त्यामुळे शिष्टमंडळाला सोमवारला भेट घेण्यास सांगितले. सोमवारी मुकाअ गोंदिया यांची भेट घेवून चर्चा केली जाणार आहे. संघटनेतर्फे ९ मार्चच्या ग्रामविकास मंत्रालयातील पत्रकानुसार तत्काल पूर्वलक्षी प्रभावाने ६ व्या वेतन आयोगानुसार कमाल मर्यादेत नक्षलभत्ता १५०० व अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करणे, २१ मार्च २०१८ च्या शिक्षण संचालनालय पुणे यांच्या पत्रकानुसार उन्हाळी सूट्टी १ मे पासून लागू करावी, सकाळपाळीत शाळेच्या वेळापत्रकात बदल करणे, फेब्रुवारीचे वेतन तत्काळ अदा करणे, चटोपाध्याय व निवडश्रेणी संदर्भातील आदेश निर्गिमत करून नविन प्रस्ताव मागण्यात यावे, प्रलंबित पुरवणी देयक बिलासाठी पंचायत समितीला निधी उपलब्ध करून द्यावे, २००२ नंतर लागलेल्या कर्मचा-यांच्या वेतनातील तफावत दूर करण्यात यावी, पदानवत उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचे समायोजन रिक्त जागी करणे, सडक अर्जुनी येथील जीपीएफ अपहार प्रकरणाची चौकशी करणे आदी मागण्यांवर चर्चा केली जाईल.
निवेदन देणाºया शिष्टमंडळात जिल्हा सरचिटणीस एल. यू. खोब्रागडे, उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा सहसचिव संदिप तिडके, एन. बी. बिसेन, सुरेश रहांगडाले, व्ही.जे. राठोड, सतिश दमाहे, नरेंद्र अमृतकर, रोशन म्हस्करे, शिनकूमार राऊत, नंदिकशोर शहारे, हूमे, राजेश जैन, वाय. वाय. रहांगडाले, पारधी उपस्थित होते.

Web Title: 1500 rupees will be applied to teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.