दोन तालुक्यातील ३६ गावांवर १.५१ कोटींची पाणीपट्टी थकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 05:26 PM2024-07-25T17:26:16+5:302024-07-25T17:27:43+5:30

बिल थकीत : वसुलीसाठी सरपंच, ग्रामसेवकांच्या पुढाकाराची गरज

1.51 crores of water dues for 36 villages in two talukas | दोन तालुक्यातील ३६ गावांवर १.५१ कोटींची पाणीपट्टी थकीत

1.51 crores of water dues for 36 villages in two talukas

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यातील ३६ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या गावांवर पाणीपट्टीचे १ कोटी ५१ लाख ३२ हजार ५१० रुपये थकीत आहेत. ती रक्कम नळ कनेक्शनधारकांनी भरण्यासाठी ग्रामपंचायतने मोहीम राबविण्याची गरज आहे.


कधी वीजपुरवठा खंडित, कधी पाइपलाइनला गळती, कधी देखभाल दुरुस्तीचे कंपनीला पैसे दिले नाही, अशा विविध कारणांनी बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद राहते. या योजनेला अविरत सुरू ठेवण्यासाठी मोजक्याच लोकांचा आटापीटा असतो. त्यातच या योजनेचे शुद्ध पाणी घेणारे नळ कनेक्शनधारकही उदासीन आहेत. शुद्ध पाणी वापरतात, परंतु पाण्याचे बिल देण्यासाठी नळ कनेक्शनधारक धजावत नाही. परिणामी ३६ गावांवर १ कोटी ५१ लाख ३२ हजार ५१० रुपये थकीत आहेत. आमगाव तालुक्यातील २५ गावांवर बोरकन्हार ४ लाख ४३ हजार ४४० रुपये, बाह्मणी ६ लाख ६५ हजार ४४४ रुपये, शिवनी ७ लाख ८७ हजार ५१२ रुपये, चिरचाळबांध ६ लाख ९१ हजार ७० रुपये, खुर्शिपार ४ लाख ३९ हजार ९२७ रुपये, जवरी ५ लाख ८८ हजार ८९२ रुपये, मानेगाव २ लाख ६० हजार ७२० रुपये, ठाणा १ लाख ५३ हजार ४७२ रुपये, बोथली ५ लाख ६ हजार ४२० रुपये, सुपलीपार ५ लाख ३७ हजार ३८४ रुपये, कालीमाटी ६ लाख ६३ हजार ४१० रुपये, किकरीपार ७ लाख ९७ हजार ७५६ रुपये, कातुर्ली १२ लाख ४० हजार ६१२ रुपये, मोहगाव ४ लाख २१ हजार १२४ रुपये, बंजारीटोला ५ लाख ८ हजार ९९६ रुपये, ननसरी २ लाख २० हजार १२४ रुपये, सरकारटोला ३ लाख १९ हजार ५६० रुपये, घाटटेमनी १ लाख ४४ हजार ३५० रुपये, पानगाव २ लाख ७७ हजार ३८६ रुपये, फुक्कीमेटा ३ लाख ९६ हजार ६४४ रुपये, धामणगाव २ लाख १५ हजार ९७४ रुपये, मुंडीपार १ लाख ९ हजार ९५० रुपये, भोसा २ लाख ५७ हजार १३२ रुपये, पाऊलदौणा १ लाख ३८ हजार ३०८ रुपये, नंगपुरा १ लाख ८६ हजार १८४ रुपये थकीत आहेत. 


चार गावांवर १८ लाख
सालेकसा तालुक्यातील ४ गावांवर १८ लाख ८०४ रुपये थकीत आहेत. यात साखरीटोला ९ लाख ६१ हजार ८०८ रुपये, कारुटोला १ लाख ६२ हजार ५१४ रुपये, सातगाव ३ लाख ५७ हजार ४९६ रुपये, हेट्टी ३ लाख १८ हजार ९८६ रुपये थकीत आहेत.


आमगाव नगरपरिषदेवर २३ लाख रुपये थकीत
आमगाव नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या ८ गावांपैकी ७ गावे या योजनेचे पाणी वापरत आहेत. यात या ७ गावांवर २३ लाख ५९ हजार ९१५ रुपये थकीत आहेत. त्यात पदमपूर, रिसामा, बिरसी, बनगाव, किडंगीपार, कुंभारटोली, आमगाव व (गणेशपूर) या गावांचा समावेश आहे.


"बनगाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी वापरणाऱ्या सर्व सरपंच- सचिवांनी आपापल्या ग्रामपंचायतकडे प्रलंबित असलेल्या पाणीपट्टी देयकांचा तत्काळ भरणा करावा. जेणेकरून पाणी वाटपात अडचण येणार नाही."
- जगदीश शर्मा, सामाजिक कार्यकर्ता,आमगाव

Web Title: 1.51 crores of water dues for 36 villages in two talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.