१५६ गावात ‘वाय-फाय’ चावळी

By admin | Published: May 25, 2017 12:46 AM2017-05-25T00:46:54+5:302017-05-25T00:46:54+5:30

गावात इंटरनेट कनेक्टीव्हीटी व मोबाइल नेटवर्कराहात नसल्याने नागरिकांना त्रास होतो. ग्रामीणांचा एकमेकांशी संपर्क होऊ शकत नाही.

In the 156 villages, the 'Wi-Fi' chawl | १५६ गावात ‘वाय-फाय’ चावळी

१५६ गावात ‘वाय-फाय’ चावळी

Next

गोंदिया व गोरेगाव तालुक्याचा समावेश : पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातून गोंदियाची निवड
नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गावात इंटरनेट कनेक्टीव्हीटी व मोबाइल नेटवर्कराहात नसल्याने नागरिकांना त्रास होतो. ग्रामीणांचा एकमेकांशी संपर्क होऊ शकत नाही. त्यांना आॅनलाईन इतर माहिती मिळू शकत नाही. अश्या गावांना आता कॉमन सर्व्हीस सेंटर (सीएससी) च्या माध्यमातून वायफायने कनेक्ट केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक गावात टॉवर लावण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात जिल्ह्यातील १५६ गावांची निवड करण्यात आली आहे. ई-गव्हर्नन्स सोसायटीच्या माध्यमातून ‘वायफाय चावळी’ योजना सुुरूवात करण्यात आली.
या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना आॅनलाईनची सेवा मिळणार आहे. गावात ५०० मीटरच्या अंतरात वाय-फायची सेवा देण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना संबधीत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या मोबाईल नंबरवर पासवर्ड जनरेट करावे लागेल. यानंतर स्वमर्जीच्या प्लाननुसार फोर जी च्या स्पीड ने इंटरनेट वापरता येईल.
ग्रामीण भागात सर्वात मोठी समस्या विद्युतची आहे. या समस्याच्या निराकरणासाठी सोलर पॉवरच्या वैकल्पीक पध्दतीवर विचार करण्यात येत आहे. गावात प्रभावीपणे वाय-फाय झोन तयार केला जाणार आहे. गावातील सर्व प्रमुख परिसराला कव्हर केले जाईल. स्मार्ट फोन, टेबलेट्स व होम डिवाइस यूजर्स संबंधित विभागाची वेबसाइटला लिंक करून याचा फायदा घेण्यात यईल. या टेस्ट व्हॅल्यू एडेड सर्विसेस च्या माध्यमातून शिक्षण साहित्य वितरीत केले जाणार आहे. शेतकऱ्यांना कृषी संबधी माहिती होईल. छोटे व्यावसायीकांसाठी या वाय-फाय सेवेचा वापर केला जाणार आहे. याचा उद्देश पोलीस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, डाकघर, ग्राम पंचायत कार्यालय, विद्यालय येथेही कनेक्टीव्हीटी मिळणार आहे.
गावांत शासकीय व खासगी एजेंसींना वाय-फायच्या माध्यमातून इंटरनेट कनेक्टीव्हिटी देण्यात येईल. घरी बसून विद्युत बील,आॅनलाईन अर्ज, कृषी संबधी माहिती, विविध योजनांच्या माहिती व्यतिरिक्त आॅनलाईन परतफेड व इतर माहिती सहजरित्या आता उपलब्ध होणार आहे.

सहा तालुके ६ महिन्यांच्या प्रतीक्षेत
वाय-फाय चावळीच्या पहिल्या टप्यात जिल्ह्याच्या ५५१ ग्राम पंचायतींपैकी गोंदिया तालुक्यातील १०२ ग्राम पंचायती तर गोरेगाव तालुक्याच्या ५४ ग्राम पंचायतींमध्ये याच आठवड्यात काम सुरू होणार आहे. यासाठी १०० पेक्षा अधिक गावांचे सर्वेक्षण झाले आहे. ३० पेक्षा अधिक ग्राम पंचायत मध्ये साहित्य टाकण्यात आले. भारत ब्रॉडबैंड निगम लि. (बीबीएनल) व सीएससी यांची संयुक्त सेवा येत्या दोन महिन्यात जिल्ह्यातील उर्वरीत सहा तालुक्यात वाय-फाय चावळीची सुरूवात करण्यात येणार आहे.

भारत सरकारच्या या योजनेंतर्गत महाराष्टाच्या गोंदिया जिल्ह्याची पहिल्या टप्यात निवड झाली. गोरेगाव व गोंदिया या दोन तालुक्यातील १५६ ग्राम पंचायतींना वाय-फाय चावळीने जोडण्याचे लक्ष आहे.
राकेश बघेले
जिल्हा व्यवस्थापक, सीएससी (कॉमन सर्विस सेंटर), गोंदिया.

Web Title: In the 156 villages, the 'Wi-Fi' chawl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.