जिल्ह्यातील १६०१ पैकी १५६५ शाळा झाल्या तंबाखू मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 05:00 AM2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:00:19+5:30

जिल्ह्यातील १६०१ शाळा तंबाखू मुक्त करण्याचा माणस शिक्षण विभागाचा आहे. या तंबाखू मुक्त शाळांसाठी शासनाने ११ निकष ठेवले आहेत. त्या निकषांची पुर्तता करून त्याची माहिती अ‍ॅपवर अपलोड करून आपल्या शाळेला तंबाखू मुक्त शाळा घोषीत करण्याच्या स्पर्धेत या सर्व शाळा आहेत. जिल्ह्यातील १६०१ शाळांपैकी १५६५ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून ३६ शाळांना तंबाखू मुक्तीचा ध्यास आहे.

1565 Out of 1601 schools became tobacco free in the district | जिल्ह्यातील १६०१ पैकी १५६५ शाळा झाल्या तंबाखू मुक्त

जिल्ह्यातील १६०१ पैकी १५६५ शाळा झाल्या तंबाखू मुक्त

googlenewsNext
ठळक मुद्देआता नजर ३६ शाळांकडे : आमगाव व देवरी तालुका झाले शंभरटक्के तंबाखू मुक्त

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : व्यक्तीमत्व विकासात शारीरिक आरोग्य अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था सुरळीतपणे कार्य करतात तेव्हा आपले आरोग्य चांगले आहे असे आपण म्हणतो. परंतु धुम्रपान, तंबाखू सेवन व मद्यपान यासारख्या घातक सवयी आरोग्यास बिघडवितात. शाळेत जाणाऱ्या १५ टक्के कुमारवयीन मुलांना तंबाखूचे व्यसन असल्याचे वास्तव पुढे आल्याने शाळाच तंबाखू मुक्त करण्याचा उपक्रम शासनाकडून राबविला जात आहे. यांतर्गत, गोंदिया जिल्ह्यातील १६०१ पैकी १५६५ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत.
जिल्ह्यातील १६०१ शाळा तंबाखू मुक्त करण्याचा माणस शिक्षण विभागाचा आहे. या तंबाखू मुक्त शाळांसाठी शासनाने ११ निकष ठेवले आहेत. त्या निकषांची पुर्तता करून त्याची माहिती अ‍ॅपवर अपलोड करून आपल्या शाळेला तंबाखू मुक्त शाळा घोषीत करण्याच्या स्पर्धेत या सर्व शाळा आहेत. जिल्ह्यातील १६०१ शाळांपैकी १५६५ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून ३६ शाळांना तंबाखू मुक्तीचा ध्यास आहे. आमगाव तालुक्यातील १५० शाळा, देवरी तालुक्यातील २०७ शाळा, सडक-अर्जुनी तालुक्यातील १६३ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून १ शाळा तंबाखुमुक्त व्हायची आहे. तिरोडा तालुक्यातील १९९ शाळांपैकी १९३ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून ३ शाळांना, सालेकसा तालुक्यातील १४६ शाळांपैकी १४४ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून २ शाळांना, गोरेगाव तालुक्यातील १५५ शाळांपैकी १५० शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून ५ शाळांना, तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १९७ शाळांपैकी १९३ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून ४ शाळांना तंबाखू मुक्तीची प्रतिक्षा आहे.
दरवर्षी जगात सुमारे ६४ लाख लोक तंबाखू मुळे मरण पावतात. सन २०३० पर्यंत जगात तंबाखूने मरणाऱ्यांची संख्या वर्षाकाठी ८० लाख होणार असल्याचा अंदाज आहे. भारतात दररोज दोन हजार ५०० लोकांचा तंबाखूने मृत्यू होतो. वर्षाकाठी १० लाखांहून अधिक लोक तंबाखूने एकट्या भारतात मरण पावतात. तंबाखू मुळे होणाºया तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधीक रूग्ण भारतात आहेत. इंटरनॅशनल एजंसी फॉर रिसर्च आॅन कॅन्सर आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार धुम्रपानात चार हजारांहून अधिक रसायन असल्याचे सांगण्यात आले. धुम्रपानात ८० आणि धुम्ररहित तंबाखू पदार्थात २८ कर्कजन्य रसायने असतात. कोणताही प्राणी तंबाखूची पाने खात नाही. सापही तंबाखूच्या शेतात जात नाही. तरीही सर्वात सुज्ञ समजला जाणारा मनुष्य तंबाखूचे सेवन करून स्वत:चेच जीवन नरकमय बनवित आहे.
तंबाखूच्या व्यसनापासून उद्याची पिढी म्हणजे किशोरवयीन मुले व शिक्षकांना यापासून दूर ठेवण्यासाठी शासनाने शाळेत आता तंबाखू मुक्त शाळा अभियान राबविणे सुरू केले आहे. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षण विभाग कामाला लागले आहे.

तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम
तंबाखू सेवनामुळे अनेक दुष्परिणाम होतात. यात, केसांना दुर्गंध येते, तोंडातून दुर्गंध येते, दात सडतात, हिरड्यांना इजा होऊन दात निकामी होतात व त्यांची मजबूती नष्ट होते, दातांवर चॉकलेटी-पिवळे डाग पडतात, वास घेण्याची क्षमता कमी होते, चेहºयावर सुरकुत्या पडतात, शरीरात अशक्तपणा जाणवतो व हाडे ठिसूळ होतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते, डोळ्यांमध्ये जळजळ होत पाणी येते. निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो, विचार करण्याची क्षमता कमी होते, चित्त एकाग्र करणे कठिण जाते. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, गळा, अन्ननलीका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय व मुखाचा कॅन्सर होतो. गँगरिन, क्षयरोग, दमा, हृदयविकार, उच्च रक्तदाब, लकवा, मधूमेह व मोतीबिंदू होते. पुरूषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होत जाते व पुरूष नपुंसक बनतो. ज्या स्त्रिया तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात त्यांची प्रजनन क्षमता कमी होते व त्यांना वंधत्व येते.

तंबाखू सोडण्यासाठी हे करा
तंबाखू सोडण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींनी तंबाखू सोडण्याच्या तारखेची घोषणा आपल्या कुटुंबिय, नातलग किंवा मित्रांसमोर करावी. तंबाखूसाठी प्रवृत्त करतील अशा लोकांपासून दूर रहावे. तंबाखू सेवनाची इच्छा झाल्यास १ ते १०० अंक मोजावे, दौड किंवा दोरीवरील उड्या घ्याव्या, प्राणायाम, कुरमुरे, चणे, शेंगदाणे, बडीशेप या पदार्थांचे सेवन करावे. तंबाखू सेवनाने शरीरात अस्तीत्वात असणारी विषारी रसायने शरीरातून बाहेर टाकण्यासाठी जास्तीतजास्त पाणी प्यावे. तसेच योग्य मित्रांसोबत आपले विचार व भावना शेअर कराव्यात.

Web Title: 1565 Out of 1601 schools became tobacco free in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.