अवैध रेती उत्खनन प्रकरणी १.५९ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 05:00 AM2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:00:27+5:30

निविदादार अनिल बिसेन यांच्यावर आकारलेल्या दंडाची रक्कम ३० दिवसात भरण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहे. मात्र या प्रकरणात सुरूवातीपासूनच प्रशासनाची भुमिका संशयास्पद असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची स्वत: लक्ष देऊन चौकशी केल्यास या प्रकरणातील खरे सत्य बाहेर येण्यास निश्चित मदत होईल.

1.59 lakh fine for illegal sand mining | अवैध रेती उत्खनन प्रकरणी १.५९ लाखांचा दंड

अवैध रेती उत्खनन प्रकरणी १.५९ लाखांचा दंड

Next
ठळक मुद्देसुरूवातीला आकारला कमी दंड : तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : तालुक्यातील वळद येथील अवैध रेती उत्खनन प्रकरणी सुरूवातीला तहसीलदारांनी निविदादार अनिल बिसेन याच्यावर १४ लाख रुपयांचा दंड आकारला होता. मात्र हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचल्यानंतर रेतीचे उत्खनन केलेल्या ठिकाणाचे मोजमाप करुन आता १ कोटी ५९ लाख ८५ हजार रुपयांचा दंड आकारला आहे. सुरूवातीला कमी दंड आकारल्याने याप्रकरणी तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्याचीे माहिती आहे.
निविदादार अनिल बिसेन यांच्यावर आकारलेल्या दंडाची रक्कम ३० दिवसात भरण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहे. मात्र या प्रकरणात सुरूवातीपासूनच प्रशासनाची भुमिका संशयास्पद असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची स्वत: लक्ष देऊन चौकशी केल्यास या प्रकरणातील खरे सत्य बाहेर येण्यास निश्चित मदत होईल. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील वळद येथील मालिकराम सीताराम पारधी व गजानन दादू पारधी यांच्या सांजा क्र मांक २० गट क्र मांक २३/२ आराजी ०.५३ हेक्टर आर जमिनीतून रेतीचे अवैधपणे करण्यात आले. रेतीचे उत्खनन करताना सदर शेतकºयाला सुध्दा अंधारात ठेवल्याची माहिती पुढे आली आहे. ५ मे च्या पूर्वीपासून शासकिय नाला परिक्षेत्रातून वाहून आलेली वाळू शेतात असल्याची माहिती बिसेन याला मिळाली. बिसेन यांनी शेत मालक गजानन पारधी यांना भूलथापा देत पैसाचे आमिष देऊन शेतातील वाळूचे अवैध उत्खनन केल्याचे बोलल्या जाते. यानंतर या वाळूची जप्तीची कार्यवाही मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या संगनमताने केल्याचा आरोप केला जात आहे. या अवैध रेती उत्खननाची माहिती महसूल विभागाच्या अधिकाºयांना देऊन सुध्दा वेळीच कारवाई केली नाही. त्यामुळे याप्रकरणात सुरूवातीपासूनच संशय व्यक्त केला जात होता. सदर रेती उत्खननात गटातील लांबी १५, उंची १.१०, रु दी १८, एकूण १०४ ब्रास रेती साठा उपसा करण्याची परवानगी असताना बिसेन यांनी प्रत्यक्षात १०३८ ब्रास रेतीचे उत्खनन केल्याची बाब तहसीलदारांनी केलेल्या चौकशीत पुढे आले. परंतु सुरूवातीला केवळ १०४ ब्रासवरच दंड आकारण्यात आला होता. त्यामुळे कारवाईत संशय निर्माण झाल्याने याची जिल्हाधिकाºयांनी दखल घेत याप्रकरणाचा तपास उपजिल्हाधिकाºयांकडे सोपविला. यात त्यांनी मौका चौकशी करुन निविदादार अनिल बिसेन याच्यावर १ कोटी ५९ लाख ८५ हजार रुपयाचा दंड ठोठवला आहे.

रायल्टी पावतीत तफावत
वळद अवैध रेती उत्खनन प्रकरणसमोर आल्यानंतर यातील बराच घोळ पुढे येत आहे. विशेष म्हणजे रायल्टी पावतीचा घोळ, वाहतूक करणाºया वाहनांची संख्या, वाहन क्र मांक, वेळ, दिनांक या सर्वच प्रकारात तफावत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी केल्यास बरेच सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.

वळद येथील अवैध वाळू उत्खनन प्रकरणात अनिल बिसेन यांनी मंजूर क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात रेतीचा उपसा केला आहे. पूर्वी जास्त प्रमाणात उत्खनन करण्यात आलेल्या रेतीची मोजणी करण्याकरिता यांत्रिकी सहाय्यक नसल्याने नेमके दंड आकरण्यात आले नव्हते. यात पुनर्रावलोकन करून अवैध वाळू उपसा केल्याचे दंड आकारण्यात आले आहे. नियमाप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. यात प्रशासनाने दखल घेतली आहे.
- दयाराम भोयर, तहसीलदार आमगाव

 

Web Title: 1.59 lakh fine for illegal sand mining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर