नकली सोने विकणाऱ्या तरूणाच्या हत्या प्रकरणात १६ आरोपी झाले स्पष्ट; पाच जणांना अटक

By नरेश रहिले | Published: September 20, 2023 04:42 PM2023-09-20T16:42:26+5:302023-09-20T16:43:46+5:30

आणखी आरोपी वाढण्याची शक्यता: अटक झालेल्या आरोपींना २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

16 accused who killed a youth selling fake gold have been identified, 5 arrested | नकली सोने विकणाऱ्या तरूणाच्या हत्या प्रकरणात १६ आरोपी झाले स्पष्ट; पाच जणांना अटक

नकली सोने विकणाऱ्या तरूणाच्या हत्या प्रकरणात १६ आरोपी झाले स्पष्ट; पाच जणांना अटक

googlenewsNext

गोंदिया : आम्हाला नकली सोने विक्री करून फसवणूक करता असे म्हणत तिघा तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत किशोर चुन्नीलाल राठौर (वय ३०, रा. गोंडीटोला, कटंगीकला) याचा मृत्यू झाला. तर संदीप मदनलाल ठकरेले (२३) व देवदीप राजेंद्र जैतवार (१८, रा. गोंडीटोला) हे जखमीं झाले. या तिघांना मारहाण करणारे १६ आरोपी पोलिसांना स्पष्ट झाले असून आणखी आरोपी वाढण्याची दाट शक्यता आहे.

गोंदिया तालुक्यातील ग्राम गोंडीटोला-कटंगीकला येथील संदीप ठकरेले, किशोर राठौर व देवदीप जैतवार हे तिघेही सोमवारी दुपारी तीन वाजता मोटारसायकलने नकली सोन्याचे झुमर विकण्याकरिता डांगोर्ली येथे गेले होते. यावर आरोपी ओमप्रकाश खिलेश्वर चौधरी (१८), अजय तुरकर (३५), शुभम ऊर्फ राजू दीपचंद ठाकरे (२३), अशोक ठाकरे (४०), आलोक बिसेन (२४, सर्व रा. कोसते, वाराशिवनी) यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत किशोर राठौर याचा मृत्यू झाला. त्यांना मारहाण करणाऱ्या पाच लोकांना अटक करण्यात आली असून या प्रकरणात आतापर्यंत १६ आरोपींचा समावेश असल्याची बाब पुढे आली आहे.

अटक केलेल्या आरोपींना बुधवारी गोंदियाच्या जिल्हासत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्या आरोपींना २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या १६ आरोपींवर रावणवाडी पोलिसांनी आरोपींवर भादंविच्या कलम ३०२, ३६४, ३८६, ३४१, १४३, १४४, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे करीत आहेत.

ही १६ नावे झाली स्पष्ट

नकली दागिणे विक्री करीत असल्याचा संशय घेऊन बेदम मारहाण केल्याने तरूणाचा मृत्यू झाला. मारहाण करणाऱ्या आरोपीत ओम चौधरी (३६), अज्जू तुरकर (३५), शुभम ठाकरे (३३), अशोक ठाकरे (४०), आलोक बिसेन (२४), महेश पटले (२४), राजू क्षीरसागर (२५), प्रदीप भगत (३०), दीपक भोरगडे (२६), रोहित भोरगडे (२८), जागू सोनवणे (३०), पंकज पटले (२७), विजय भोरगडे (३५), अंकित रहांगडाले (२४), जीवनलाल हरीणखेडे (४५), नितीन ठाकरे (२२) व इतर आरोपींना सर्व रा. कोस्ते ता. वाराशिवनी जि. बालाघाट यांच्या समावेश आहे.

डांगोर्लीच्या बसस्थानकावर चार मोटारसायकलवर आले ९ लोक

नकली सोन्याच्या नावावर फसवणूक करणाऱ्याला धडा शिकविण्याचा माणस ठेवत मध्यप्रदेशातून चार मोटारसायकलने आलेल्या नऊ जणांनी डांगोर्ली बस्थानकावर दिसलेल्या किशोर राठौर यांच्या मोटारसायकलला लाथ मारून त्यांना जमीनीवर पाडले. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. पहिल्या गाडीवर चार लोक आले. नंतर तीन गाडीवर पाच लोक आले. अश्या नऊ जणांनी आधी डांगोर्ली येथे मारहाण करून त्यांना जबरदस्तीने आपल्या गाडीवर बसवून मध्यप्रदेशच्या डोंगरगाव येथे नेले.

तीन तास टॉर्टर अन् उभारीने मारहाण

नकली सोने विक्री करण्यासाठी मध्यप्रदेशच्या डोंगरगाव येथे गेलेल्या किशोर राठौर हा लगेच परत डांगोर्लीला आला. त्याच्यासोबत गेलेले दोघे डांगोर्ली येथे त्याची वाट पाहात होते. परंतु दािगणे सोडून दिड लाख रूपये आणण्यासाठी गेलेला किशोर राठौर लगेच परत येऊन आपल्या सहकाऱ्यांना सरळ गोंदिया चला असे म्हणत निघाला. परंतु त्याच्या पाठोपाठ चार मोटारसायकलवर आलेल्या नऊ जणांना डांगोर्ली येथे पकडून मारहाण केली. नंतर डोंगरगाव येथे नेऊन तब्बल तीन तास त्यांना टॉर्चर करून उभारीने मारहाण केली.

तिघांना सोडण्यासाठी १० लाखाच्या खंडणीची मागणी 

नकली दागिणे विकून तुम्ही आमची फसवणूक करता म्हणत आरोपींनी किशोर राठौरसह तिघांना मारहाण केली. डोंगरगाव येथील शेतात नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. तुम्हाला जर सुटायचे आहे तर १० लाख द्या त्या शिवाय सोडणार नाही अशी धमकी देत मारहाण केली. मोनू राठौर व त्याचे सहकारी १० लाख रूपयाची जुळवाजुळव करण्यासाठी त्यांनी अनेकांना फोन केला. यातील एकाने ५ हजार रूपये आरोपींना एटीएम मधून काढून दिले.

Web Title: 16 accused who killed a youth selling fake gold have been identified, 5 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.