१६ जोडपी झाली परिणयबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 10:05 PM2018-05-09T22:05:30+5:302018-05-09T22:05:30+5:30

बौद्ध सामूहिक विवाह समिती, भारतीय बौद्ध महासभा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमघाट स्मारक समिती पांगोली नदी तसेच तथागत क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध सामूहिक विवाह रविवारी मुन्सीपल गर्ल्स हायस्कूल जसानी बालक मंदिर येथे पार पडला.

16 Couples became furious | १६ जोडपी झाली परिणयबद्ध

१६ जोडपी झाली परिणयबद्ध

Next
ठळक मुद्देबौद्ध सामूहिक विवाह सोहळा : पाच आंतरजातीय जोडप्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बौद्ध सामूहिक विवाह समिती, भारतीय बौद्ध महासभा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमघाट स्मारक समिती पांगोली नदी तसेच तथागत क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध सामूहिक विवाह रविवारी मुन्सीपल गर्ल्स हायस्कूल जसानी बालक मंदिर येथे पार पडला. यात १६ जोडपी परिणयबद्ध झाली. यात ५ आंतरजातीय जोडप्यांचा समावेश होता.
अध्यक्षस्थानी सामूहिक विवाह समितीचे संस्थापक अ‍ॅड.ए.बी. बोरकर होते. उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष के.बी. चव्हाण होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाहेकर नर्सिंग स्कूलचे संचालक बाहेकर, विशाल अग्रवाल, न.प. बांधकाम सभापती शकील मंसुरी, सुरेंद्र खोब्रागडे, अ‍ॅड.कराडे, अ‍ॅड.रंगारी, अ‍ॅड.गडपायले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी तागडे व गजभिये यांनी वर-वधूंच्या नावांची यादी वाचून दाखविली. महासचिव गीता चव्हाण यांनी बाहेरुन आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
विवाह बौद्ध पद्धतीने उपासिका तथा महासचिव गीता चव्हाण यांच्या हस्ते पार पाडण्यात आला. उपस्थितांनी पुष्प वर्षाव करुन वर-वधूंचे स्वागत केले व वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी स्टेज कलावंत सुनील नागवंशी यांनी सामूहिक विवाहा सोहळ्यात तीन भीम गीते सादर केली.
कार्यक्रमासाठी एन.टी. बोरकर, अंकेश तिवारी, गौतम गणवीर, मंजुश्री बोरकर, हुसेन मेश्राम, विनोद मेश्राम, राजू बोरकर, विशाल शेंडे, रवी मडामे, अशोक मेश्राम, नागवंशी, अनुनाथ भिमटे, बाबा वाहने, रमेश ठवरे, पी.एस. फुले, श्यामकुंवर, मनोज पेंटर, महेंद्र मेश्राम, सुरेश बोरकर, स्वप्नील बोरकर, विवेक बन्सोड, कावळे, सारनाथ बोरकर, युगल गणवीर, रुपेश डोंगरे, महेश बोरकर आदींनी सहकार्य केले.

Web Title: 16 Couples became furious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न