१६ लाखांचे वाहन जाळणाऱ्याला न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:28 AM2021-02-13T04:28:00+5:302021-02-13T04:28:00+5:30
विजय जनार्दन खोब्रागडे (५३, रा. राधाकृष्ण वॉर्ड श्रीनगर) यांना दिलेल्या तक्रारीनुसार ११ फेब्रुवारीच्या पहाटे ३ वाजताच्या दरम्यान आरोपी ...
विजय जनार्दन खोब्रागडे (५३, रा. राधाकृष्ण वॉर्ड श्रीनगर) यांना दिलेल्या तक्रारीनुसार ११ फेब्रुवारीच्या पहाटे ३ वाजताच्या दरम्यान आरोपी गणेश रामदास बन्सोड (३०, रा. चंद्रशेखर वॉर्ड श्रीनगर गोंदिया) याने वाहनांना आग लावली. या आगीत एमएच ३५ एजी ८३० किंमत ९ लाख ३१ हजार रुपये, टाटा एसएक्स एमएच ३५ एजे ०४०५ किंमत ४ लाख रुपये, दोन सोफासेट किंमत एकूण ९७ हजार ७०७ रुपये, हीरो कंपनीची पॅशन प्रो. काळ्या रंगाची मोटारसायकल क्रमांक एमएच ३५ एएन- ९२८३ किंमत ३० हजार रुपये, सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची डिझायर चार चाकी वाहन क्र. एमएच ३५ एजी ५७१६ किंमत १ लाख ५० हजार रुपये अशा एकूण १६ लाख ८ हजार ७०७ रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४३५ अन्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपी गणेश रामदास बन्सोड (३०) याला अटक करून न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे करीत आहेत.