१६५ गावे होणार ‘जलयुक्त’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 11:55 PM2018-07-01T23:55:19+5:302018-07-01T23:56:15+5:30
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१८-१९ साठी जिल्हास्तरीय कमिटीकडून १६५ गावांना मंजुरी मिळाली आहे. मात्र दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप गावांचे आराखडे बनविणे व गावस्तरावर ग्रामसभांमध्ये मंजुरी घेण्याचे काम पूर्णत्वास गेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१८-१९ साठी जिल्हास्तरीय कमिटीकडून १६५ गावांना मंजुरी मिळाली आहे. मात्र दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप गावांचे आराखडे बनविणे व गावस्तरावर ग्रामसभांमध्ये मंजुरी घेण्याचे काम पूर्णत्वास गेले नाही. तरी १६५ गावे जलयुक्त होणार, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
यात गोंदिया तालुक्यातील आंभोरा, वडेगाव, चारगाव, छिपिया, इर्री, जिरूटोला, कामठा, कटंगटोला, खातिया, कोरणी, मोरवाही, मुंडीपार खु., पांजरा, परसवाडा, रजेगाव, सातोना, सावरी, सरकारटोला, शिरपूर, झिलमिली, आसोली, रतनारा, बनाथर, बरबसपुरा, बटाना, भादुटोला, चिरामणटोला, जगनटोला, कोचेवाही, लंबाटोला, मरारटोला, मोगर्रा व मुरपार अशा सर्वाधिक ३४ गावांचा समावेश आहे. गोरेगाव तालुक्यातील आसलपाणी, ईसाटोला, तुमखेडा बु., बोळूंदा, कुºहाडी, गणखैरा, धानुटोला, बोरगाव, रामाटोला, खाडीपार, सर्वाटोला, पिंडकेपार, बबई, तुमसर, तेढा, पालेवाडा, म्हसगाव, कवडीटोला, हिराटोला व पलखेडा या २० गावांचा समावेश आहे. तर तिरोडा तालुक्यातील केसलवाडा, खेडेपार, कुल्पा, लेदडा, मनोरा, मुरपार, नांदलपार, निलागोंदी, सिल्ली, सोनेखारी, सितेपार, बोदा, किंडगीपार, सावरा, बिहिरिया, भुराटोला, मुंडीकोटा, सरांडी, खुरखुडी व डोंगरगाव या २० गावांचा समावेश आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तिडका, देऊळगाव, चापटी, इंजोरा, कोहालगाव, सोमलपूर, भुरसीटोला, पांढरवानी-रै, सुकडी, निलज, चान्ना, अरततोंडी, धाबेटेकडी-आदर्श, सिरेगावबांध, चुटिया व संजयनगर अशा १६ गावांचा समावेश आहे. तर आमगाव तालुक्यात मंजूर झालेल्या १५ गावांमध्ये रामजीटोला, वाघडोंगरी, रामाटोला, धावडीटोला, धोबीटोला, मक्कीटोला, तिगाव, आसोली, बोथली, ठाणाटोला, बुराडीटोला, शिवणटोला, मोहगाव, सोनेखारी व वडद गावाचा समावेश आहे. तसेच देवरी तालुक्याच्या मंजूर २७ गावांमध्ये मुरमाडी, चिपोटा, सुकडी, रोपा, पिपरखारी, वडेकसा, शिरपूरबांध, टोयागोंदी, हळदी, पावरटोला, धानोरी, बोंडे, पळसगाव, रेहडी, भागी, निलज, म्हल्हारबोडी, चिचेवाडा, सिंदीबिरी, सालई, पांढरवानी, डवकी, पिंडकेपार-देवरी, पिंडकेपार-चि, सुरतोली, मुल्ला व देवाटोला गावांचा समावेश आहे.
तसेच सालेकसा तालुक्यातील बिजेपार, ब्राह्मणी, डोमाटोला, हल्बीटोला, खेडेपार, कोटरा, कुंभारटोला, लभानधारणी, लटोरी, नवेगाव, लोहारा, पांढरी, पाणगाव, पाऊलदौना, सोनपुरी, तिरखेडी, मरकाखांदा, मराबजोब व पठानटोला अशी १९ गावे तर सडक-अर्जुनी तालुक्यातील सितेपार, दोडके-जांभळी, कोकणा-जमि., खोबा-चिंगी, कोहळीटोला-चिखली, मोहघाट, धानोरी, दल्ली, सालेधारणी, चिरचाडी, राजगुडा, खडकी, कोसमघाट व खजरी अशा १४ गावांचा समावेश आहे.
अशी एकूण १६५ गावे यावर्षी जलयुक्त शिवार अभियानातून जलयुक्त करण्यात येणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी गावांची संख्या दुपटीपेक्षा अधिक आहेत.
जिल्ह्यातील ५८२ कामे अपूर्णच
मागील वर्षी सन २०१७-१८ मध्ये शासनाच्या विविध विभागांना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेल्या ६३ गावांमध्ये एकूण १९९१ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्या सर्वांना प्रशासकीय मान्यता मिळून त्यासाठी ७१८६.४४ लाख रूपयांची तरतूद होती. यापैकी १९४८ कामांना कार्यारंभाचे आदेश देण्यात आले होते. त्यातही १९१२ कामे सुरू करण्यात आली होती. यात २९ गावांमध्ये १३३० कामे १०० टक्के पूर्ण करण्यात आली. तर ५८२ कामे अपूर्णच असून त्यांचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे.