गांजाची विक्री करणाऱ्यास १७ पर्यंत पाेलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:27 AM2021-05-16T04:27:52+5:302021-05-16T04:27:52+5:30
गोंदिया : तालुक्याच्या कामठा येथील नामे घनश्याम ऊर्फ मोनू हरिचंद अग्रवाल (वय २५) याच्या घरून स्थानिक गुन्हे शाखेच्या ...
गोंदिया : तालुक्याच्या कामठा येथील नामे घनश्याम ऊर्फ मोनू हरिचंद अग्रवाल (वय २५) याच्या घरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ७० किलो २५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. त्याची किंमत ८ लाख ४३ हजार आहे. ही कारवाई १३ मे रोजी रात्री ९.१० वाजता कामठा येथे करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कामठा येथील घनश्याम ऊर्फ मोनू हरिचंद अग्रवाल यांच्या घरून तो गांजा जप्त केला आहे.
घनश्याम अग्रवाल याने आपल्या घरी एका खोलीत तीन मोठया प्लॅास्टिक पाेतडीत ७० किलो २५० ग्रॅम वजनाचा गांजा ठेवला होता. तो गांजा जप्त करण्यात आला. आरोपीला न्यायालयाने १७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ओरिसा येथून गांजा आणल्याची माहिती त्याने दिली. मात्र तो गांजा कुणी आणून दिला, याची माहिती त्याने दिली नाही. पोलीस कोठडीत तो काय नवीन माहिती देते, याकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे. आरोपीवर रावणावडी पोलिसांनी मादक पदार्थविरोधी अधिनियम कलम ८, २० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करण्याची कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार अर्जुन कावळे, भुवनलाल देशमुख, राजू मिश्रा, सहायक फौजदार गोपाल कापगते, अर्जुन कावळे, महेश मेहर, रेखलाल गौतम, नेवालाल भेलावे, इंद्रजित बिसेन, तुलसीदास लुटे, वीज मानकर महिला पोलीस शिपाई सुजाता गेडाम, विनाेद गौतम यांनी केली.