ग्रामीण रस्त्यांसाठी १.७२ कोटींचा निधी
By admin | Published: September 9, 2014 12:29 AM2014-09-09T00:29:05+5:302014-09-09T00:29:05+5:30
विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील रस्ते बांधकामासाठी राज्य शासनाने १ कोटी ७२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाने या संदर्भात ३ सप्टेंबर रोजी आदेश काढले आहेत.
गोंदिया : विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील रस्ते बांधकामासाठी राज्य शासनाने १ कोटी ७२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाने या संदर्भात ३ सप्टेंबर रोजी आदेश काढले आहेत.
क्षेत्रात घेण्यात आलेल्या ग्रामसभा तसेच जनसंपर्क दौऱ्यांतर्गत कार्यकर्ता व नागरिकांनी रस्ता बांधकामाला घेऊन केलेल्या मागणी केली होती. या मागण्यांना गांभीर्याने घेत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी जिल्हा नियोजन समितींतर्गत १ कोटी ७२ लाख रूपयांच्या निधीतून गाव जोड रस्ते बांधकामास मंजूरी देण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती. सततच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने अखेर १ कोटी ७२ लाख रूपयांच्या रस्ते बांधकामाला मंजूरी देत ३ सप्टेंबर रोजी तसे आदेश काढले.
या निधीतून ग्राम सावरी- लोधीटोला, ईर्री- कामठा, पिंडकेपार- सेंद्रीटोला, संजयनगर- पिंडकेपार, पिंडकेपार ग्राम अंतर्गत रस्ता, कटंगी ग्राम अंतर्गत रस्ता, आसोली ग्राम अंतर्गत रस्ता, सतोना- धामनगाव-बनाथर ते जनगटोला रस्ता, आसोली-पाटीलटोला- टेमनी रस्ता, आसोली- नवरगाव रस्ता, बिरसी- दासगाव रस्ता, सिवनीटोला- गर्रा रस्ता, सावरी- अर्जुनी रस्ता तसेच नवरगावकला- करंजी रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, यातील नवरगावकला-करंजी रस्ता बांधकामाची मागणी मागील कित्येक वर्षांपासून केली जात होती. मात्र नवरगावकला गोंदिया विधानसभा क्षेत्रात तर करंजी आमगाव विधानसभा क्षेत्रात येत असल्याने यासाठी निधी मिळत नव्हता. मात्र शासनाने आता या रस्ता बांधकामासाठी २० लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. पावसाळा संपताच या सर्व रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले जाणार असल्याचे आमदार अग्रवाल यांनी कळविले आहे.