गोंदिया शहरात १७२० नवे मतदार

By admin | Published: August 24, 2016 12:02 AM2016-08-24T00:02:38+5:302016-08-24T00:02:38+5:30

मतदार नाव नोंदणी कार्यक्रमांतर्गत शहरात १७२० नवे अर्जदार नोंद होणार आहेत. म्हणजेच निवडणूक विभागाकडे एवढे अर्ज आले असून

1720 new voters in Gondia city | गोंदिया शहरात १७२० नवे मतदार

गोंदिया शहरात १७२० नवे मतदार

Next

३१ पर्यंत नाव नोंदणी : इच्छुक उमेदवारांकडून घेतला जातोय पुढाकार
गोंदिया : मतदार नाव नोंदणी कार्यक्रमांतर्गत शहरात १७२० नवे अर्जदार नोंद होणार आहेत. म्हणजेच निवडणूक विभागाकडे एवढे अर्ज आले असून त्यांची एंट्री करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे. याशिवाय आणखीही अर्ज येणे सुरूच असून हा आकडा वाढणार आहे. यासाठी येत्या ३१ तारखेपर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे.
गोंदिया आणि तिरोडा नगर परिषदांचा कार्यकाळ पाच महिन्यांत संपणार आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व पक्षांसह इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. त्यांच्याकडून आपल्या वॉर्डातील नवमतदारांची नोंदणी करण्याकडे जास्त लक्ष दिले जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून सध्या सर्वत्र नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू आहे. यासाठी निवडणूक विभागाकडून जिल्ह्यात सर्वत्र मतदार नोंदणी कार्यक्रम राबविला जात असून नाव नोंदणी केंद्रावर ही सुविधा नवीन मतदारांसाठी सुरू करण्यात आली आहे. या केंद्रांवर बीएलओंची नियुक्ती करून मतदारांना अर्ज देण्यापासून सर्व मार्गदर्शन व त्यांचे अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू आहे.
मतदार नाव नोंदणीचा हा कार्यक्रम सध्या गोंदिया शहरासाठी अतिशय महत्वाचा दिसून येत आहे. त्याचे कारण असे की, येत्या जानेवारी महिन्यात नगर परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपणार असून निवडणूक लागणार आहे.
यात या नव्या मतदारांची नोंद होणे गरजेचे असून याचा फायदा उमेदवारांना मिळणार आहे. यासाठी शहरातील चार विद्यालय व चार महाविद्यालयांत विशेष केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
सन २०११ च्या जणगणनेनुसार शहराची लोकसंख्या एक लाख ३२ हजार ८१३ आहे. तर मतदार नाव नोंजणीसाठी सुरू असलेल्या केंद्रांवर आजवर १७२० अर्ज आले असून त्यांची एंट्री करण्याचे काम सुरू आहे. याचा अर्थ असा काढता येईल की, शहरात १७२० नवीन मतदारांची भर पडणार असून आणखीही अर्ज येतच आहेत. त्यामुळे शहरातील मतदारांची संख्या वाढणार आहे. (शहर प्रतिनिधी)

युवा वर्गात वाढतोय उत्साह
मतदान कसे करतात, मशीन कशी असते याचा उपयोग करून आपल्या बोटावरही मतदाना नंतर बोटावर शाई लावून घेण्यासाठी युवा वर्गात उत्साह असतो. हाच उत्साह सध्या नाव नोंदणी मोहिमेंतर्गत दिसून येत असून त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येत नवीन मतदारांचे अर्ज निवडणूक विभागाकडे जमा होत आहेत. त्यामुळे १ जानेवारी २०१६ पूर्वी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहेत त्यांनी आपली नाव नोंदणी करावयाचे आवाहन केले जात आहे.

संभावित उमेदवारांकडून सेवा
नवीन मतदार नाव नोंदणीसाठी संबंधितांना केंद्रांवर जाऊन अर्ज भरावा लागत आहे. मात्र शहरात येत्या निवडणुकीला बघता राजकारणी व निवडणूक लढण्यास इच्छूक नवीन मतदारांच्या सेवेसाठी धावून जात आहेत. त्याचे असे की, या राजकारणी व इच्छुकांकडून त्यांच्या प्रभागातील नवीन मतदारांची माहिती जाणून त्यांच्या घरी जावून अर्ज देणे व अर्ज भरून घेऊन कार्यालयात जमा करण्यापर्यंतची सर्व सेवा दिली जात आहे. जेणेकरून या मतदार व त्यांच्या परिवारासोबत वैयक्तीक संबंध निर्माण व्हावे व त्याचा लाभ निवडणुकीत मिळावा या यामागचा हेतू आहे. शहरात सध्या हेच चित्र बघावयास मिळत आहे.
 

Web Title: 1720 new voters in Gondia city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.