बाधितांच्या 174 उच्चांकी आकड्याची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 05:00 AM2022-01-13T05:00:00+5:302022-01-13T05:00:03+5:30

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी १६७० चाचण्या करण्यात आल्या. यात १४०६ जणांची आरटीपीसीआर, तर २६४ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १७४ नमुने कोरोनाबाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.९६ टक्के आहे. मंगळवारी बाधितांच्या संख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, बुधवारी रुग्ण संख्येने उच्चांक गाठल्याने जिल्हावासीयांची काळजी वाढविली आहे.

174 high number of victims recorded | बाधितांच्या 174 उच्चांकी आकड्याची नोंद

बाधितांच्या 174 उच्चांकी आकड्याची नोंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. चार दिवसांत ४०० बाधितांची नोंद झाली आहे. बुधवारी (दि. १२) जिल्ह्यात तब्बल १७४ बाधितांची नोंद झाली असून, गेल्या पंधरा दिवसांतील या उच्चांकी आकड्याची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यावासीयांना अधिक सर्तक होत काळजी घेण्याची गरज आहे. 
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी १६७० चाचण्या करण्यात आल्या. यात १४०६ जणांची आरटीपीसीआर, तर २६४ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १७४ नमुने कोरोनाबाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.९६ टक्के आहे. 
मंगळवारी बाधितांच्या संख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, बुधवारी रुग्ण संख्येने उच्चांक गाठल्याने जिल्हावासीयांची काळजी वाढविली आहे. त्यातच गोंदिया आणि आमगाव तालुक्यात रुग्णसंख्येत अधिक वाढ होत असल्याने दोन्ही तालुके कोरोनाचे हाटस्पॉट झाले आहे. 
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४८१७४५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात २५५५८७ नमुन्याची आरटीपीसीआर, तर २२६१५८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. 
यात ४१७९१ नमुने कोरोना बाधित आढळले. यापैकी ४०५८१ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. उपचार घेत असलेल्या १४ बाधितांनी कोरोनावर मात केली.

 गोंदिया  डेंजर झोनमध्ये
- जिल्ह्यात सर्वाधिक ३२२ रुग्णांची नोंद गोंदिया तालुक्यात झाली आहे. तर, आमगाव ६० आणि सालेकसा तालुक्यात ३९ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण गोंदिया तालुक्यात आढळत असल्याने हा तालुका कोरोनाचा हाटस्पॉट झाला असून डेंजर झोनमध्ये गेला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 

रुग्णालयात केवळ ३७ रुग्ण 
- जिल्ह्यात सध्यस्थितीत ४९५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, यापैकी केवळ ३७ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत तर उर्वरित रुग्ण गृहविलगीकरणात आहे. या रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने त्यांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे. 

पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय 
कोरोनाबाधितांच्या संख्येत मागील आठवडाभरापासून सातत्याने वाढ होत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ४९५ पोहोचला असून त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही निश्चित थोडी चिंताजनक बाब आहे. 
१०० नमुने पाठविणार 
- ओमायक्रॉनच्या अनुषंगाने चाचणी करण्यासाठी दिल्ली व पुणे येथील प्रयोगशाळेत १०० नमुने पाठविण्यात येणार आहे.

निर्बंध नको असतील तर नियमांचे करा पालन 
- कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात झपाट्याने वाढत असून अद्यापही ही बाब जिल्हावासीयांनी गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळे निर्बंधात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कडक निर्बंध नको असतील तर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची गरज आहे. 

 

Web Title: 174 high number of victims recorded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.