कोरोनाचे नियम मोडणाऱ्या १७७५ ग्रामीणांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:26 AM2021-08-01T04:26:52+5:302021-08-01T04:26:52+5:30
नरेश रहिले गोंदिया: कोरोनाचे नियम पाळले जावेत यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सजग होता. कोट्यवधीच्या घरात पोलीस अणि ...
नरेश रहिले
गोंदिया: कोरोनाचे नियम पाळले जावेत यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सजग होता. कोट्यवधीच्या घरात पोलीस अणि जिल्हा प्रशासनाने दंड वसूल केला. परंतु ग्रामीण भागातीलही लोक कोरोनाला गांभीर्याने घ्यावेत यासाठी ग्रामीण भागातील लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील १७७५ लोकांवर दंड आकारण्यात आला. यात सर्वाधीक लाेकांवर दंड सडक-अर्जुनी तालुक्याने केला आहे.
गोंदिया जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचायती आहेत. गोंदिया तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींनी ३१४ लोकांवर प्रत्येकी २०० रूपये प्रमाणे दंड आकारण्यात आला. इतर सात तालुक्यात १०० रूपये प्रतीव्यक्ती प्रमाणे दंड आकारण्यात आला. आमगाव तालुक्यातील ५७ ग्राम पंचायतींनी १९८ जणांवर दंडात्मक कारवाई केली. तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींनी १८९ लोकांवर दंड आकारला. गोरेगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींनी २९३ जणांवर दंडात्मक कारवाई केली. सडक-अर्जुनी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींनी ४५२ जणांवर दंडात्मक कारवाई केली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींनी १८४ जणांवर दंडात्मक कारवाई केली. देवरी तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींनी १०० जणांवर दंडात्मक कारवाई केली. सालेकसा तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींनी ३५ जणांवर दंडात्मक कारवाई केली.
.........................
दंडापोटी २ लाख वसूल
जिल्ह्यातील ५४५ ग्राम पंचायतींनी कोरोनाचे निय तोडणाऱ्या ग्रामपंचायतींकडून दंडापोटी २ लाख ८ हजार ९०० रूपये दंड वसूल केला आहे. हा दंड गाव विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी हा केलेला गावकऱ्यांचा उपक्रम आहे.
............
एकाही व्यक्तीवर एफआयआर नाही
कोरोनाचे नियम सतत मोडत असलेली व्यक्ती व कोरोनाचा प्रसार करीत असेल अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे प्रावधान होते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील एकाही व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
................
कोट
कोरोनाला आळा घालण्यासाठी गावकरी सजग होते. संशयीतांना अलगीकरण करणे, विलगीकरण करणे, बाहेरून येणाऱ्यांची माहिती देणे, संशयीत रूग्णाला होम क्वारंटाईन करणे अशी सर्व कामे ग्रामपंचायतींनी केली. नियम मोडणाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून ग्रा.पं.नी दंडही आकारला आहे.
-आर.एल.पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)