सराईत चोरट्यास वेगवेगळ्या गुन्ह्यात १८ महिन्यांची शिक्षा
By admin | Published: August 3, 2016 12:29 AM2016-08-03T00:29:24+5:302016-08-03T00:29:24+5:30
येथील नागरिकांची झोप उडविणारा सराईत चोरटा प्रविण अशोक डेकाटे (२२) याला येथील न्यायदंडाधिकारी आर. व्ही. डफरे यांनी ...
सराईत चोरट्यास वेगवेगळ्या गुन्ह्यात १८ महिन्यांची शिक्षा
मोहाडी : येथील नागरिकांची झोप उडविणारा सराईत चोरटा प्रविण अशोक डेकाटे (२२) याला येथील न्यायदंडाधिकारी आर. व्ही. डफरे यांनी वेगवेगळ्या चार गुन्ह्यात १८ महिन्याची शिक्षा सुनावली आहे.
१३ सप्टेंबर २०१४ ला विरेंद्र निखारे रा.टिळक वॉर्ड यांच्या घराच्या मागच्या दरवाज्याची कडी काढून अलमारीतील १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. १७ सप्टेंबर २०१४ ला साजीद शेख रा.नेहरु वॉर्ड यांच्या घराच्या खिडकीतून रात्रीला घरात प्रवेश करुन ३३ हजारांचा मुद्देमाल चोरी गेला होता. या गुन्ह्यात मोहाडी पोलीस ठाण्यात कलम ४५७, ३८० भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यापूर्वी २६ आॅगस्ट २०१४ ला खुशाल निमजे यांच्या घरासमोर ठेवलेली त्यांची दुचाकी एम एच ३६ एम ८६१३ चोरीला गेली होती. २८ आॅगस्ट २०१४ ला निखिल सुरेश सुखदेवे रा. टिळक वॉर्ड यांच्या घरी ठेवलेली टिव्हीएस फोर्ट ही दूचाकी चोरीला गेली होती. या गुन्ह्यात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वारंवारच्या चोऱ्यामुळे पोलिसांवर नागरिकांचा दबाव वाढत होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रविण डेकाटे याला अटक केली. त्याच्यावर दोन घरफोडीचे व दोन दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल केले. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांच्या मार्गदर्शनात जगन्नाथ गिऱ्हेपुंजे, राजेश बापरे यांनी पुरावे गोळा करून गुन्ह्यातील सोन्याचे दागिने व चोरी गेलेल्या दुचाकी हस्तगत केली. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जगन्नाथ गिऱ्हेपुंजे यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावर विरेंद्र निखारे यांच्या कडील चोरीच्या गुन्ह्यात सहा महिन्याची शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड व न भरल्यास एक महिना शिक्षा तसेच साजीद शेख यांच्या गुन्ह्यात सहा महिन्याची शिक्षा व दोन हजार रुपये दंड तसेच दोन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात प्रत्येकी तीन तीन महिन्याची शिक्षा व प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)