दिलासा ! बाधितांपेक्षा मात करणारे जास्त, १८ जणांनी दिली कोरोनाला मात
By कपिल केकत | Published: April 25, 2023 06:00 PM2023-04-25T18:00:52+5:302023-04-25T18:02:01+5:30
१४ बाधितांची पडली भर
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना झपाट्याने आपले पाय पसरताना दिसत असून, कोरोना बाधितांनी संख्या शंभरी पार झाली आहे. अशात मंगळवारचा दिवस मात्र दिलासा देणारा ठरला. कारण मंगळवारी (दि. २५) जिल्ह्यात जेथे १४ बाधितांची भर पडली तेथेच १८ बाधितांनी कोरोनाला मात दिली. यानंतर आता जिल्ह्यात १२१ कोरोना बाधित असून, यातील एक उपचारासाठी रुग्णालयात भरती आहे.
घेण्यात आलेल्या १९७ चाचण्यांमध्ये हे १४ बाधित आढळून आले आहेत. यानंतर आता जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेशो ७.१ वर आला आहे. तर जिल्ह्यातील एकूण चाचण्यांची संख्या ५४०२४४ एवढी झाली असून, यामध्ये २८३९०६ एवढ्या आरटीपीसीआर चाचण्या असून, २५६३३८ एवढ्या रॅपीड अँटीजन चाचण्या आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत जिल्ह्यात ४७०५४ बाधित आढळून आले असून, ४६२०३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.