१८१ हेक्टर वनाची राख
By admin | Published: April 22, 2016 03:35 AM2016-04-22T03:35:11+5:302016-04-22T03:35:11+5:30
हवा, पाणी, जंगल व पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा अविचारी वापर केल्याने आज मानवाला ग्लोबल वार्मिंगचा फटका
नरेश रहिले ल्ल गोंदिया
हवा, पाणी, जंगल व पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा अविचारी वापर केल्याने आज मानवाला ग्लोबल वार्मिंगचा फटका सहन करावा लागत आहे. वातावरण निर्मितीमुळे अकाली पाऊस किंवा अवर्षनाची स्थिती निर्माण झाली आहे. होणाऱ्या वृक्षांच्या कत्तलीमुळे व जंगलांना लागणाऱ्या आगिमुळे परिस्थिती बदलत आहे. एकीकडे वसुंधरा बचावाचा संदेश दिला जात आहे तर दुसरीकडे त्याच वसुंधरेचा विनाश करण्यासाठी मनुष्य मागेपुढे पाहत नाही. याचा प्रत्यय दिसून येत आहे. गोंदिया जिल्ह्यात यावर्षी १८१.३५ हेक्टर वनजमिनीला आग लागली आहे. त्यामुळे वनांचा ऱ्हास होत आहे.
गोंदिया जिल्हा वनांनी नटलेला असून गोंदिया जिल्ह्यातील वनजमिनीच्या ४३ टक्के जमिनीवर वन आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा वनांनी नटलेला दिसत असला तरी गोंदिया जिल्ह्यात आगीच्या घटना मागच्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढलेल्या आहेत. सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात आगीच्या सहा घटना घडल्या असून त्यात १६.७५ हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. नवेगावबांध वनपरिक्षेत्रात आगीच्या १८ घटना घडल्या असून त्यात ४०.५० हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. गोठणगाव वनपरिक्षेत्रात आगीच्या सहा घटना घडल्या असून त्यात २५.१० हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. गोरेगाव वनपरिक्षेत्रात आगीच्या दोन घटना घडल्या असून त्यात १३ हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. सालेकसा वनपरिक्षेत्रात आगीच्या ४ घटना घडल्या असून त्यात ३० हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. आमगाव वनपरिक्षेत्रात आगीच्या दोन घटना घडल्या असून त्यात ८ हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. गोंदिया वनपरिक्षेत्रात आगीच्या दोन घटना घडल्या असून त्यात २ हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे.
अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रात आगीच्या आठ घटना घडल्या असून त्यात१३.५० हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. उत्तर देवरी वनपरिक्षेत्रात आगीच्या सहा घटना घडल्या असून त्यात ८.५० हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे.
चिचगड वनपरिक्षेत्रात आगीच्या ५ घटना घडल्या असून त्यात २४ हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. गोंदिया जिल्ह्यातील ५०० एकर जंगलात आग लागली. मात्र या आगित नुकसान किती झाले याची आकडेवारी वनविभागाने लपवून ठेवली आहे.
ब्लोअरमुळे आग नियंत्रणात
४वनातील आगीवर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी यावर्षी १८० ब्लोअर घेण्यात आले आहे. जुने ५० ब्लोअर असे मिळून २३० ब्लोअर वनविभागाकडे आहे. लागलेल्या आगींवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाने या ब्लोअरचा वापर केल्याचे सांगितले गेले.
फायर लाईनवर खर्च केले ५० लाख
४वनांना आग लागू नये यासाठी वनविभागाने फायरलाईन तयार करण्यासाठी सतत तीन महिने गावातील मजुरांना काम देवून त्यांच्याकडून फायरलाईनचे काम करण्यात आले. ५० लाख रुपये जिल्ह्यात फायरलाईनसाठी देण्यात आले. या फायरलाईनच्या कामात भ्रष्टाचार होतो असा कांगावा दरवर्षी राहत असल्याने यावर्षी फायरलाईनचे काम करण्याची जबाबदारी संयुक्त वनव्यवस्थापन समितीला देण्यात आली होती.