स्थानकावरील चोरीच्या १९ मोटारसायकल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:24 AM2018-12-29T00:24:35+5:302018-12-29T00:25:13+5:30

रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई करून एका मोटारसायकल चोराला पकडले. त्याच्यांजवळून चोरीच्या १९ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. या सर्व मोटारसायकल नागपूर, दुर्ग व गोंदिया रेल्वे स्थानकावरून पळविल्याचे पुढे आले आहे.

19 stolen motorcycle seized from the station | स्थानकावरील चोरीच्या १९ मोटारसायकल जप्त

स्थानकावरील चोरीच्या १९ मोटारसायकल जप्त

Next
ठळक मुद्देनागपूर, दुर्ग, गोंदियातून चोरी : रेल्वे पोलीस व सुरक्षा बलाच्या जवानांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई करून एका मोटारसायकल चोराला पकडले. त्याच्यांजवळून चोरीच्या १९ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. या सर्व मोटारसायकल नागपूर, दुर्ग व गोंदिया रेल्वे स्थानकावरून पळविल्याचे पुढे आले आहे.
२५ डिसेंबरला आमगाव ठाण्यांतर्गत येणाऱ्या सितेपार येथील दुर्गेश वासुदेव कटरे यांनी रात्री ९.३० वाजता रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात केलेल्या तक्रारीनुसार ते आपल्या आईवडीलांना रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांची मोटारसायकल एमएच ३५/टी-२२४७ ही चोरीला गेली. रेसुबच्या टास्क चमूने उपनिरीक्षक विनेक मेश्राम, मुख्यआरक्षक पी. दलाई, आरक्षक पी.एल.पटेल, विकास पटले, आर.डी.टेकाम, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक एस.एस. बघेल, रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे, पी.भिमटे, आरक्षक पी.मिश्रा यांनी प्रभारी निरीक्षक एस.किरण व ठाणेदार डी.एम.नालट यांच्या मार्गदर्शनात सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेतली. फुटेजच्या आधारवर आरोपीचा शोध घेणे सुरू केले. २७ डिसेंबरला दुपारी १ वाजता श्री टॉकीज चौकातील दारू दुकानाजवळ एक व्यक्ती मोटरसायकल एमएच ३५/टी-२२४७ ला धक्का देत नेत असताना आढळला.त्याला पकडल्यावर त्याने वाल्मिकी लोकचंद हरिणखेडे (३४) रा. कुºहाडी (पाथरी) गोरेगाव असे नाव सांगितले. त्या दारू दुकानाजवळ उभी असलेली मोटारसायकल एमएच ३१ सी यू ६४७४ ही चोरीची असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या मोटारसायकल चोरीचे फुटेज पाहिले असता तोच इसम ती मोटारसायकल चोरी करताना आढळला. विचारपूस केल्यावर त्याचा एक मित्र कुºहाडी येथील भुºया काटेवार (३०) त्याला सहकार्य करीत असल्याचे सांगितले. त्याच्याजवळही चोरीचे वाहन असल्याची माहिती दिली. पोलिसांनी वाल्मिकी या आरोपीच्या घरी धाड घातल्यावर त्याच्या अंगणात एमएच ४० आर ४०११ व एमएच ३५ एन ५२०२ ही मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. त्याच्या मित्राच्या घराच्या अंगणातून पाच मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. भुºया पोलिसांच्या हातात लागला नाही. अधिक विचारपूस केल्यावर वाल्मिकीने दिलेल्या माहितीनुसार नागपूर, दुर्ग, गोंदिया रेल्वे स्थानकातून १५ ते २० मोटरसायकल चोरण्यासाठी मास्टर चाबीचा वापर करीत असल्याचे सांगितले. चोरी केलेले वाहन नातेवाईकांना व मित्रमंडळींना अत्यंत गरज असल्याचे दाखवून विक्री केल्याची कबुली त्यांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या १९ मोटारसायकलची किंमत १० लाख ३० हजार रूपये असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: 19 stolen motorcycle seized from the station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.