अभियांत्रिकीच्या १९ विद्यार्थ्यांना दाखविले अनुपस्थित

By admin | Published: June 25, 2017 01:08 AM2017-06-25T01:08:19+5:302017-06-25T01:08:19+5:30

येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली

19 students of engineering absent | अभियांत्रिकीच्या १९ विद्यार्थ्यांना दाखविले अनुपस्थित

अभियांत्रिकीच्या १९ विद्यार्थ्यांना दाखविले अनुपस्थित

Next

नागपूर विद्यापीठाचा कारभार : ‘त्या’ विद्यार्थ्यांचा निकाल नापास
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली मात्र त्यांना एका पेपरला गैरहजर दाखवून नागपूर विद्यापीठाने नापास दाखविले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.
मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय गोंदिया येथील द्वितीय वर्षाच्या कम्प्यूटर टेक्नॉलॉजी या माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी ४ सेमचा ‘इंट्रोडक्शन टू मेन फेम ’ या विषयाचा पेपर दिला. त्या पेपरला गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरहजर असल्याचे दाखवून त्यांचा निकाल नापास दाखविण्यात आला. शुक्रवार (दि.२३) रोजी नागपूर विद्यापीठाने निकाल जाहीर केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना नापास दाखविल्याने त्या विद्यार्थ्यांना धडकी भरली. त्यांनी महाविद्यालय गाठले त्यांनी यासंदर्भात प्राचार्य व विभाग प्रमुखांसोबत बोलून यासंदर्भात नागपूर विद्यापीठाला कळविण्याची विनंती केली. त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यासंदर्भात माहिती महाविद्यालयातर्फे नागपूर विद्यापीठाला पाठविण्यात आले. परंतु नागपूर विद्यापीठात बसलेल्या लिपीक वर्गाच्या अनागोंदी कारभारामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना गैरहजर दाखवून त्यांचा निकाल नापास दाखविण्यात आला आहे. निकाल शुक्रवारी आल्यामुळे सर्व विद्यार्थी शनिवारी महाविद्यालयात पोहचले. परंतु महिन्याचा चवथा शनिवार असल्याने विद्यापीठ बंद, रविवारची सुट्टी, पुन्हा सोमवारी रमजान ईद असल्यामुळे सलग तिन सुट्या आल्याने आपण वेळीच आक्षेप कसा घेणार या संभ्रमात विद्यार्थी होते.
महाविद्यालयाने या बाबीची दखत घेत मंगळवारी विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांचा निकाल बरोबर करण्यासाठी त्यांच्या सर्व हजेरी विद्यापीठात पोहोचविणार असल्याचे सांगण्यात आले.

गैरहजर दाखविलेले विद्यार्थी
काम्प्यूटर टेक्नॉलॉजी या माध्यमाच्या १९ विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाने गैरहजर दाखविले. त्यात प्रणय बावणकर, हरिष बहेकार, हिमांशू मेश्राम, करण राजभार, कार्तिक यादव, मनिष उके, प्रजय बागडे, प्रखर दिक्षीत, प्रणय भगत, शंकर चिमाणी, श्रेयस ईटानकर, शुभम शरणागत, सेल्व्हन्स ऐंथोनी, रजत शेंदरे, शुभम घोष, सुभाशू बावणथडे, उदीत खोटेले, विपीनकुमार पटले, यश चांदवानी अशी सदर विद्यार्थ्यांची नावे आहेत.

पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविण्यात आले. ही नागपूर विद्यापीठाची चुकी आहे. आम्ही विद्यार्थ्यांची हजेरी,गैरहजेरी बरोबर पाठविली आहे. या १९ विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लिपीकासह मी स्वत: मंगळवारी नागपूर विद्यापीठात जाईल.
- आय.सी. मेहता
कम्प्यूटर टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख एमआयटी गोंदिया.

 

Web Title: 19 students of engineering absent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.