६९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 09:51 PM2019-08-28T21:51:38+5:302019-08-28T21:52:37+5:30

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळते.त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी यंदा जिल्ह्यातील ६९ हजार ३०२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला.

19,000 farmers have taken out crop insurance | ६९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

६९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या संख्येत प्रथमच वाढ : कर्जदार शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक , ६ हजार शेतकऱ्यांनी स्वेछेने काढला विमा

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हवामानातील बदलाचा सर्वाधिक परिणाम पिकांवर होत आहे. तर मागील दोन तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळते.त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी यंदा जिल्ह्यातील ६९ हजार ३०२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र यात पीक कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक असून स्वत:हून विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फार कमी आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे पीक घेतले जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ९२ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शिवाय शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र ऑगस्ट महिन्यात सुरूवातीपासून चांगला पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले. पण हवामान विभागाचे अंदाज देखील वांरवार चुकत असल्याने नैसगिक संकटापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढला.
विशेष म्हणजे मागील चार पाच वर्षांच्या तुलनेत यंदा पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.ही जरी समाधानकारक बाब असली तरी यात कर्जदार शेतकºयांचे सर्वाधिक प्रमाण आहे. तर स्वत:हून पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या त्या तुलनेत फार कमी आहे.
यंदा जिल्ह्यातील एकूण ६९ हजार ३०२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यात ६३ हजार ४१२ शेतकरी हे कर्जदार गटातील असून ५ हजार ८९० शेतकरी बिगर कर्जदार गटातील आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी एकूण ३८ हजार ६६९ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला असून विमा हप्त्यापोटी १४ कोटी १७ लाख ६२ हजार २५७ रुपये विमा कंपन्याकडे भरले आहेत.

पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँक अपयशी
शासनाने यंदा खरीप हंगामात जिल्हा, राष्ट्रीयीकृत आणि ग्रामीण बँकांना २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. मात्र जिल्हा आणि ग्रामीण बँका वगळता राष्ट्रीयीकृत बँकांना उद्दिष्ट गाठण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. राष्ट्रीयकृत बँकानी केवळ ४० टक्केच पीक कर्जाचे वाटप केले. त्यामुळे नाबार्डकडून पुढील वर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.

विमा कंपन्यांचा अनुभव वाईट
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा कंपन्याबाबत वाईट अनुभव आहे. त्यामुळेच कृषी विभागाच्या व्यापक जनजागृतीनंतरही शेतकरी स्वत:हून पीक विमा काढण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. पीक कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा काढणे अनिवार्य केले असल्याने शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र स्वत:हून विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही अजूनही विचार करण्यास भाग पाडणारी आहे.

Web Title: 19,000 farmers have taken out crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.