२९१ गावांना दारुबंदीचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 10:42 PM2019-08-23T22:42:55+5:302019-08-23T22:46:01+5:30

दुर्धर आजारामुळे एकाच व्यक्तिचा मृत्यू होतो. परंतु दारुमुळे दारु पिणाऱ्याचे अख्खे कुटूंब मरते. यासाठी दारु विरोधात एल्गार पुकारण्यात महिला मंडळी अग्रेसर असतात. गावागावांत दारुबंदी विरोधात महिलांनी मोहीम छेडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकून दारुबंदी न केल्यास तुम्हाला निवडणुकीत सहकार्य करणार नाही, अशा धमक्या ही महिला मंडळी गावातील पुढाऱ्यांना देतात.

192 villages suffer from starvation | २९१ गावांना दारुबंदीचा ध्यास

२९१ गावांना दारुबंदीचा ध्यास

googlenewsNext
ठळक मुद्देतंटामुक्त मोहिमेला महिलांचा पाठिंबा : महिलांच्या पुढाकारामुळे दारुमुक्त होऊ पाहतो गोंदिया जिल्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गडचिरोली व चंद्रपूर यानंतर गोंदिया जिल्हा शंभर टक्के दारुबंदी होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांच्या घेतलेल्या आढाव्यानुसार एक हजार १०१ गावांपैकी ८१० गावांमध्ये दारुबंदी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. उर्वरित २९१ गावात आता दारूबंदी करण्यासाठी जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या व महिला मंडळी किती सजग आहेत याची प्रचिती येते.
दुर्धर आजारामुळे एकाच व्यक्तिचा मृत्यू होतो. परंतु दारुमुळे दारु पिणाऱ्याचे अख्खे कुटूंब मरते. यासाठी दारु विरोधात एल्गार पुकारण्यात महिला मंडळी अग्रेसर असतात. गावागावांत दारुबंदी विरोधात महिलांनी मोहीम छेडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकून दारुबंदी न केल्यास तुम्हाला निवडणुकीत सहकार्य करणार नाही, अशा धमक्या ही महिला मंडळी गावातील पुढाऱ्यांना देतात. परिणामी आपली मते खराब होणार नाही याची काळजी घेत दोन-चार दारु विक्रेत्यांच्या विरोधात समिकरण तयार करुन गावात दारुबंदीसाठी ठराव घेण्याचा प्रयत्न करतात.
गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या छोट्या-मोठ्या एक हजार १०१ गावांपैकी ८१० गावांमध्ये दारुबंदी तंटामुक्त समिती महिला मंडळींनी गठित केल्याची बाब पुढे आली आहे.
महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या शासन निर्णयात गावातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धंदे बंद पाडून त्यांना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा आधार घेत तंटामुक्त समित्या व महिला मंडळींनी गावातील अवैध धंदे म्हणजे दारुला मुख्य समजून या दारुला आपल्या गावातून हद्दपार करण्याचा मानस बांधला. त्यामुळे जिल्ह्यातील ८१० गावांमध्ये दारुबंदी झाली आहे.रु विकणाऱ्यांचे धंदे बंद करुन त्यांना गावात सुरु होणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या कामावर प्राधान्य देण्यात आले आहे.
आर्थिक बचत; कलह कमी
दारूमुळे पैशांची नासाडी होऊन गृहकलह वाढते. यामुळे महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतल्याने ८१० गावातील दारूबंद करण्यात आली. त्यामुळे या गावातील दारू पिणाऱ्या व्यक्तींच्या पैशांची बचत झाली. दारूबंदी झाल्याने वादही कमी झाले. दारूबंदीमुळे गावातील वातावरण आता सुधारत आहे. मद्यप्राशन करून गावातील चौकाचौकात धिंगाणा घालणाऱ्यांनी मंदिराची वाट धरली आहे.
२९१ गावांकडे लक्ष
जिल्हा दारूबंदी करण्यासाठी फक्त २९१ गावे उरली आहे. महिलांनी या गावांमध्ये कंबर कसून दारूबंदी करण्यास सुरूवात केल्यास जिल्ह्यात दारूबंदी करण्यास वेळ लागणार नाही. राज्यातील दारूबंदी होणारा तिसरा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याचे नाव पुढे येईल. ही गावे दारूबंदी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेऊन महिलांची मदत करणे आवश्यक आहे.

Web Title: 192 villages suffer from starvation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.