२ कोटी ६२ लाखाने ग्राहकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:18 AM2019-01-19T00:18:44+5:302019-01-19T00:19:28+5:30
अधिक परताव्याच्या आमिषाला बळी पडून सहकारी पतसंस्था, बँका, ईतर सहकारी पतसंस्था व बॅकेत पैसे टाकलेल्या ग्राहकांचे पैसे बुडाले. तसेच नोकरीच्या नावावर मोठ्या प्रमाणात गंडविण्यात आले. असे फसवणुकीचे ६८ गुन्हे वर्षभरात दाखल करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अधिक परताव्याच्या आमिषाला बळी पडून सहकारी पतसंस्था, बँका, ईतर सहकारी पतसंस्था व बॅकेत पैसे टाकलेल्या ग्राहकांचे पैसे बुडाले. तसेच नोकरीच्या नावावर मोठ्या प्रमाणात गंडविण्यात आले. असे फसवणुकीचे ६८ गुन्हे वर्षभरात दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांची तपासणी केली असता जिल्ह्यात २ कोटी ६२ लाखाने फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे.
सहकारी कायद्याखाली काम करणाऱ्या पतसंस्था, मल्टीलेव्हल मार्केटींग संस्था, शिक्षण संस्था, घरासाठी कर्ज देणाºया संस्था, नोकरी देणाºया संस्था, शेअर्स देणाºया संस्था व नोंदणी झालेल्या कंपन्या ग्राहकांना गंडा घालत आहेत. काही पतसंस्थानी व मल्टीलेवल मार्केटींग कंपन्यांनी ग्राहकांना लुबाडले. परंतु त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले नाही. मात्र त्यांच्या एजंटाना धमकाविण्याचे काम केले जात आहे. चिटफंड कंपन्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या खिशातील पैसा खाली झाला आहे. गोंदिया जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या वर्षभरात फसवणुकीचे ६८ गुन्हे दाखल करण्यात आले. दोन पतसंस्थांनी २७ लाख ७५ हजार ६८८ रूपये हडपले. यातील ७३ हजार ४ आरोपींकडून जप्त करण्यात आले. बँक व्यवहारात अपहार झाल्याचे चार प्रकरण दाखल करण्यात आले. या चार प्रकरणात ३३ लाख ८३ हजार ३०१ रूपयाचा गंडा घालण्यात आला. नोकरीचे आमिष देऊन लुटल्याचे ६ गुन्हे दाखल करण्यात आले. यात सहा गुन्ह्यात ३८ लाख ७४ हजाराने लुटल्याची बाब पुढे आली व ९ आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. जमीन खरेदीविक्री व्यवहारात फसवणूक झाल्याचा एक गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात १० लाखाने फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आंतरराज्यीय किंवा आंतरराष्टÑीय स्तरावर व्यवसाय, व्यापाराच्या नावाने कट रचून फसवणूक केल्याचा एक गुन्हा दाखल करण्यात आला. यात ४ लाख ६० हजाराने फसवणूक करण्यात आली. इतर सर्वसाधारण आर्थिक फसवणूकीचे ५४ गुन्हे दाखल करण्यात आले. यात एक कोटी ४७ लाख ३९ हजार १८४ रूपयाने फसवणूक करण्यात आली. यातील ३ लाख ५५ हजार ९४६ रूपये जप्त करण्यात आले. यात ३७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.