महाविद्यालयांत २० टक्के अतिरिक्त जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:32 AM2018-07-11T00:32:27+5:302018-07-11T00:32:45+5:30
बीकॉम व बिएसस्सी या शाखांत विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळावा. यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांत अतिरिक्त २० टक्के जागांना नागपूर विद्यापीठाचे कुुलगुरू काणे यांनी मंजुरी दिली आहे. याबाबत लवकरच अधिकृत आदेश निघणार आहेत. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मागणीवरून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बीकॉम व बिएसस्सी या शाखांत विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळावा. यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांत अतिरिक्त २० टक्के जागांना नागपूर विद्यापीठाचे कुुलगुरू काणे यांनी मंजुरी दिली आहे. याबाबत लवकरच अधिकृत आदेश निघणार आहेत. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मागणीवरून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या बीकॉम व बीएसस्सी या दोन शाखांकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे. त्यात आता दरवर्षी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने या दोन शाखांत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचण येते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना बाहेर जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. मात्र ते आर्थिकदृष्टया परवडण्यासारखे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेत आमदार अग्रवाल यांनी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु काणे यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली. आमदार अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाणीव करून दिली. तसेच यावर शासनाकडून जेव्हा अधीक महाविद्यालय सुरू केले जाईल तेव्हा केले जाईल. मात्र आता विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी त्वरीत निर्णय घेण्याची मागणी केली. यावर कुरूगुरू काणे यांनी सर्वच महाविद्यालयांत सद्यस्थितीत असलेल्या विद्यार्थी क्षमतेच्या २० टक्के अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सहमती दर्शविली. विशेष म्हणजे, याबाबत एक-दोन दिवसांत अधिकृत आदेश काढण्याचे आश्वासनही त्यांनी आमदार अग्रवाल यांना दिले आहे.