जिल्ह्यात २० ब्लॅक स्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:12 PM2018-04-16T22:12:43+5:302018-04-16T22:12:43+5:30

वाहनांची वाढती संख्या आणि वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष व युवकांमध्ये बाईक स्टंटबाजीची वाढत चालली क्रेझ यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे.

20 black spots in the district | जिल्ह्यात २० ब्लॅक स्पॉट

जिल्ह्यात २० ब्लॅक स्पॉट

Next
ठळक मुद्देपरिवहन विभागाने केले सर्वेक्षण : वर्षभरात ५१ जणांचा मृत्त्यू

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वाहनांची वाढती संख्या आणि वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष व युवकांमध्ये बाईक स्टंटबाजीची वाढत चालली क्रेझ यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. तर बऱ्याच महामार्गावरील वळण मार्ग आणि अपघातग्रस्त स्थळांची माहिती नसल्याचे अपघात होवून वाहन चालकांचा बळी गेला आहे. वाढते अपघात कमी करण्यासाठी जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांचे उपप्रादेशिक विभागातर्फे सर्वेक्षण करण्यात आले. मागील वर्षभरात ७० अपघातात ५२ जणांचा मृत्यू झाला. तर ११० जण अपघात जखमी झाले. अपघात व जखमींच्या संख्येवरुन जिल्ह्यात एकूण ‘२० ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत.
उपप्रादेशिक परिवहन विभागाने जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांचे सर्वेक्षण केले. त्यांच्या सर्वेक्षणात एकूण २० ब्लॅक स्पॉट असल्याचे आढळले. याचा अहवाल राज्याच्या परिवहन विभागासह केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे. या २० ब्लॅक स्पॉटचे जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जिल्हा पातळीवर रस्त्यावरील ब्लॅक स्पॉटची यादी नव्याने तयार करण्याचे निर्देश राज्याच्या परिवहन आयुक्तांना दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्टÑ रस्ते विकास महामंडळ व रस्ते बांधणीत सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे याची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभागाशी संपर्क साधून जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट निश्चित केले. प्राथमिक सर्वेक्षणात जिल्ह्यात एकूण ६० ब्लॅक स्पॉट आढळले. मात्र त्यानंतर पुन्हा अपघातांच्या संख्येनुसार २० ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले. सर्वेक्षणानुसार सर्वाधिक अपघात होणारे स्थळ, तसेच या स्थळांची दुरूस्ती करुन वाढत्या अपघातांना प्रतिबंध लावता येईल. असा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागविण्यात आला. ब्लॅक स्पॉट ठरविण्यासाठी दिलेल्या निकषांप्रमाणे रस्त्यावरील साधारणात: ५०० मीटरचे तुकडे व जेथे मागील दोन तीन वर्षांत झालेले अपघात, त्यातील जखमी व मृतांची संख्या यावरुन हे ब्लॉक स्पॉट निश्चित करण्यात आले. या निकषानुसारच पोलीस ठाण्यात अपघातांच्या स्थळाबाबत असलेल्या नोंदी आणि त्या ठिकाणी झालेली जीवीतहानी, जखमींची संख्या यांचा अभ्यास करुन ब्लॅक स्पॉटची निवड करण्यात आली. ही स्थळे निवडल्यानंतर वाढत्या अपघातांना प्रतिबंध लावण्यासाठी ब्लॅक स्पॉटवर दीर्घकालीन व तात्पुरत्या उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहे.
जिल्ह्यातील २० ब्लॅक स्पॉटची यादी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून परिवहन आयुक्त व केंद्र सरकारला पाठविण्यात आली आहे. २० ब्लॅक स्पॉटमध्ये सर्वाधिक स्थळे गोंदिया शहर आणि गोंदिया ग्रामीण क्षेत्रातील आहेत.
उपाय योजनांसाठी निधीची मागणी
जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या २० ब्लॅक स्पॉटवर दुरूस्ती व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने २० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली संबंधित मंत्रालयाकडे केली आहे. हा निधी मिळाल्यानंतर उपाय योजना केल्या जाणार आहेत.
२० ब्लॅक स्पॉटमध्ये या स्थळांचा समावेश
जयस्तंभ चौक, नागरा, फुलचूर नाका, ढिमरटोली, खमारी, कुडवा नाका, बालाघाट टी पार्इंट, कंटगी, सावरी कॅनल, मुरपार, चंगेरा पेपरमिल, दासगाव, मुंडीकोटा, सहकारनगर (तिरोडा), बिरसी (फाटा), काचेवानी, परसवाडा, कवलेवाडा भानपूर, नवाटोला मार्गावरील स्थळांचा समावेश आहे.
या ठिकाणी सर्वाधिक अपघात
परिवहन विभागाने निवडलेल्या २० ब्लॅक स्पॉट पैकी सर्वाधिक अपघात बालाघाट टी पार्इंट, चंगेरा पेपरमिलजवळ आणि तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा मार्गाचा समावेश आहे.

Web Title: 20 black spots in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.