विदर्भ तेली महासंघाची २० जागांची मागणी
By Admin | Published: August 18, 2014 11:32 PM2014-08-18T23:32:42+5:302014-08-18T23:32:42+5:30
विदर्भ तेली समाज महासंघाच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे, मंत्री नितीन राऊत, राजेंद्र मुळक यांची भेट घेऊन विधानसभेच्या विदर्भातील
सालेकसा : विदर्भ तेली समाज महासंघाच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे, मंत्री नितीन राऊत, राजेंद्र मुळक यांची भेट घेऊन विधानसभेच्या विदर्भातील २० जागा काँग्रेसने तेली समाज कार्यकर्त्याला द्याव्या, अशी मागणी निवेदनाव्दारे केली.
विदर्भात तेली समाज २० टक्के असून त्यांना योग्य प्रमाणात प्रतिनीधीत्व देण्यात येत नाही. आमदार, खासदार, महामंडळावर तेली समाजाला प्रतिनिधीत्व देण्यात येत नाही. काँग्रेसने तेली समाजाला मंत्रीपद दिले नाही. महामंडळावर घेतले नाही. पक्षाने फक्त समाजाचा उपयोग केलेला आहे. तेव्हा आतातरी काँग्रेसने तेली समाजाला विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात एक किंवा दोन जागा दिल्या पाहिजे अशी अपेक्षा महासंघाने व्यक्त केली.
शिष्टमंडळात विदर्भ तेली समाजाचे अध्यक्ष मधुकरराव वाघमारे, संघटक रघुनाथ शेंडे सिदेंवाही, माजी आ.देवराम भांडेकर मूल, सुरेश भांडारकर गडचिरोली, प्रकाश भुरे, तुुलाराम साकुरे भंडारा, आनंद कृपाण, प्रा.डॉ.नामदेव हटवार, अलका कृपाण गोंदिया, भाऊराव नासरे नरखेड, संजय शेंडे, अनुप हुलके नागपूर, निलकंठ शेंडे वर्धा यांचा समावेश होता.
विदर्भातील ब्रम्हपुरी, चिमूर, बल्लारपूर, चंद्रपूर जिल्हा, दक्षिण नागपूर, रामटेक, काटोल (नागपूर जिल्हा), तुमसर, साकोली (भंडारा जिल्हा), गोंदिया (गोंदिया जिल्हा), हिंगणघाट, वर्धा, देवरी, पुलगाव (वर्धा जिल्हा), अमरावती, मोर्शी (अमरावती जिल्हा), मेहकर (बुलढाणा जिल्हा), यवतमाळ, दारव्हा (यवतमाळ जिल्हा), मंगरुळपीर (वाशिम जिल्हा), अकोला विधानसभा क्षेत्राची मागणी मुख्यमंत्र्याकडे विदर्भ तेली समाज महासंघाने केली आहे. (तालुका प्रतिनिधी)