२० हजार शिधापत्रिका आधार लिकिंगच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 10:17 PM2018-01-05T22:17:02+5:302018-01-05T22:17:14+5:30
अंत्योदय आणि दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा पुरवठा केला जातो. यात सुधारणा करण्यासाठी पीओएस (पार्इंट आॅफ सेल) प्रणाली विकसीत करण्यात आली. यासाठी शिधापत्रिका आधारकार्डसह लिंक करणे अनिवार्य आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अंत्योदय आणि दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा पुरवठा केला जातो. यात सुधारणा करण्यासाठी पीओएस (पार्इंट आॅफ सेल) प्रणाली विकसीत करण्यात आली. यासाठी शिधापत्रिका आधारकार्डसह लिंक करणे अनिवार्य आहे. अथवा संबंधित शिधापत्रिकाधारकाला स्वस्त धान्य मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. जिल्ह्यातील २० हजार शिधापत्रिका अद्यापही आधार लिकिंग झाल्या नसल्याचीे माहिती पुढे आली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचे वितरण पीओएस मशीनद्वारे करण्यात येणार आहे. आधार क्रमांकाची खात्री करुन पोओएसव्दारे धान्याचे वितरण फेब्रुवारी महिन्यांपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे शिधापत्रिका आधारकार्ड लिंक गरजेचे आहे. अन्यथा संबंधित शिधापत्रिकाधारकाला स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. यापुढे सर्व स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिका आधार क्र मांकाशी जोडून धान्याचे वितरण केले जाणार आहे.
त्यासाठी आधारकार्ड क्र मांक असणे अनिवार्य आहे. जिल्ह्यात एकूण अंत्योदय व प्राधान्य गटाचे २ लाख ४३० शिधापत्रिकाधारक असून ९९७ रास्तभाव दुकानातून त्यांना दरमहा धान्याचे वितरण करण्यात येते. यापैकी आत्तापर्यंत १ लाख ८० हजार ४३० शिधापत्रिका आधारकार्डसह लिंक करण्यात आल्या आहेत. तर २० हजार शिधापत्रिकाधारकांनी अद्यापही आधारकार्ड लिंक केलेले नसल्याची माहिती आहे. पीओएसद्वारे धान्याचे वितरण करताना दुकानदारांना येणाºया अडचणीवर मात करण्याच्या हेतूने पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी सुध्दा काम करीत आहेत. सातत्याने स्वस्तधान्य दुकानदारांच्या सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. शिधापत्रिकारधारकांनी आधार क्र मांक लिंक न केल्यामुळे त्यांना स्वस्त धान्य मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाने नुकतेच काढले आहे.