२०० ग्रामसेवकांचे पाच कोटी रूपये थकीत

By admin | Published: August 3, 2016 12:16 AM2016-08-03T00:16:15+5:302016-08-03T00:16:15+5:30

शासकीय सेवेत १२ वर्षे ग्रामसेवक म्हणून सेवा पूर्ण केल्यानंतरही त्यांची अंशदायी पेन्शन योजनेची थकीत रक्कम

200 crores of rupees worth Rs | २०० ग्रामसेवकांचे पाच कोटी रूपये थकीत

२०० ग्रामसेवकांचे पाच कोटी रूपये थकीत

Next

प्रकरण अंशदायी पेन्शन योजनेचे : ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर धरणे
भंडारा : शासकीय सेवेत १२ वर्षे ग्रामसेवक म्हणून सेवा पूर्ण केल्यानंतरही त्यांची अंशदायी पेन्शन योजनेची थकीत रक्कम जिल्हा परिषदकडून देण्याबाबत टाळाटाळ होत आहे. जिल्ह्यातील २०० ग्रामसेवकांचे सुमारे पाच कोटी रूपये थकीत आहे. ती देण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याने ग्रामसेवकांनी आज सोमवारला जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.
ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांवरच जिल्हा परिषद प्रशासनाकडून अन्याय होत आहे. याचा निषेध करण्यासाठी ग्रामसेवक युनियनच्यावतीने जिल्हा परिषदसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष शिवपाल भाजीपाले, प्रमोद तिडके, राजू महंत, श्याम बिलवने यांनी केले. जिल्ह्यातील सातही पंचायत समिती अंतर्गत सुमारे ३५० ग्रामसेवक कार्यरत असून हे सर्व या आंदोलनात सहभागी झाले. जिल्हा परिषदने २००४ मध्ये कंत्राटी ग्रामसेवकांची पदभरती केली. त्यांचा तीन वर्षांचा सेवाकाळ झाल्यानंतर त्यांना सेवेत नियमित करण्यात आले.
दरम्यान प्रत्येक ग्रामसेवकांच्या वेतनातून अंशदायी पेंशन योजनेच्या नावावर वेतनावर आधारीत काही रक्कम कपात केली. कपात झालेली रक्कमेवर शासन हिस्सा व त्यावर १० टक्के व्याज अशी सुमारे अडीच ते तीन लाखांची रक्कम ग्रामसेवकांना मिळणे गरजेचे आहे.
ग्रामसेवक संघटनेने याबाबत अनेकदा जिल्हा परिषद प्रशासनाला विचारणा केली. मात्र, त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सुमारे २०० ग्रामसेवकांना यातून पाच कोटींची रक्कम मिळणे आहे. ती अद्याप मिळालेली नाही किंंवा त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे ग्रामसेवकांसमोर संभ्रमावस्था निर्माण झाल्याने संघटनेने वेळोवेळी आंदोलन केली. आज धरणे आंदोलन करून निर्वाणीचा इशारा दिला आहे.
आंदोलनाला जयंत गडपायले, विवेक भरणे, एम. सी. खांडाळकर, एन. जी. सौदागर, एम. एस. शेंडे, रमेश झोडे, प्रभाकर रामटेके, यु. के. पाटे, अमित चुटे, मंगला डहारे, पी. आर. रामटेके, नरेश शिवणकर यांच्यासह अन्य ग्रामसेवक आंदोलनात सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)


 

Web Title: 200 crores of rupees worth Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.