दोन दिवसांत अवैध दारूचे २१ गुन्हे
By admin | Published: January 23, 2017 12:20 AM2017-01-23T00:20:28+5:302017-01-23T00:20:28+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि.२० व २१ जानेवारी या दोन दिवसात अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरूद्ध
हातभट्ट्या व विक्रेत्यांवर धाडसत्र : ११ आरोपींना केली अटक
गोंदिया : राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि.२० व २१ जानेवारी या दोन दिवसात अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरूद्ध राबविलेल्या मोहीमेत २१ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यात ११ आरोपींना अटक करून एकूण २ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शन जिल्हाभर ही मोहीम राबविण्यात आली. त्यात अवैध दारूभट्ट्या, मोहा दारू विक्रेते व देशी दारूची विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर धाडसत्र राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत दि.२० व २१ जानेवारी रोजी हातभट्टीची दारू गाळणाऱ्या व विक्री करणाऱ्यांविरूद्ध २१ गुन्हे नोंदविले. त्यात १० प्रकरणात आरोपी हाती लागले, तर ११ बेवारस भट्ट्या आढळल्या.
या मोहिमेत एकूण २१९ लिटर दारू, ९२५० लिटर मोहा सडवा, ३४ लिटर देशी दारू आणि हातभट्टीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण २.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक केलेल्या आरोपींमध्ये नरेश प्रेमलाल खांडेकर रा.अदासी, ता.गोंदिया, बेबीनंदा रमेश उंदीरवाडे, रा.डव्वा ता.सडक अर्जुनी, नाना चरणदास उके रा.संत रविदास वार्ड, ता.तिरोडा, मीराबाई पुरणलाल पगरवार रा.गंगाझरी, वामन माणीकचंद कटरे, रा.केऊटोली, शाकीलराम किसान रा.केऊटोली, अनिल मारोती उईके रा.ओझीटोला,, गणपत किसाने रा.केउटोली, मुन्ना मोतीराम बोरकर रा.बाक्टी, ता.अर्जुनी मोरगाव, विजय साखरे रा.तुमसर ता.गोरेगाव व अलंकार बोरकर रा.बाक्टी यांचा समावेश आहे.
ही कारवाई अधीक्षक धार्मिक यांच्या मार्गदर्शनात सीमा तपासणी नाका देवरीचे पथक, निरीक्षक एस.के.सहस्त्रबुद्धे, स.दु.निरीक्षक एस.एम.राऊत, गोंदियाचे स.दु.निरीक्षक हुमे व रहांगडाले, जवान सिंधपुरे, हरिणखेडे, पागोटे, कांबळे, मुनेश्वर, ढोमणे, तऱ्हाटे, बन्सोड, ढाले, डिबे, उईके व सोनबर्से यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)