२१ विंधन विहिरींना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 10:37 PM2018-01-18T22:37:46+5:302018-01-18T22:37:58+5:30

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता अर्जुनी-मोरगाव शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये पिण्याच्या पाण्याचे साधन व्हावे यासाठी नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे यांनी शर्तीचे प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले व जिल्हाधिकाऱ्यांनी २१ विंधन विहिरींना मंजुरी प्रदान केली असून .....

21 sanction of Fuel wells | २१ विंधन विहिरींना मंजुरी

२१ विंधन विहिरींना मंजुरी

Next
ठळक मुद्देपोर्णिमा शहारे : पाणीटंचाईवर मात करण्यात होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता अर्जुनी-मोरगाव शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये पिण्याच्या पाण्याचे साधन व्हावे यासाठी नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे यांनी शर्तीचे प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले व जिल्हाधिकाऱ्यांनी २१ विंधन विहिरींना मंजुरी प्रदान केली असून लवकरच कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे यांनी सांगितले.
अर्जुनी-मोरगाव नगर पंचायत कार्यक्षेत्रात पाण्याचा साठा कमी आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने स्थिती अधिकच गंभीर असून येणाºया काळात पाणी टंचाईची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेत, गावात पाण्याची सोय व्हावी म्हणून नगर पंचायतच्यावतीने पाठपुरावा करण्यात आला. १४ व्या वित्त आयोगांतर्गत २१ विंधन विहिरींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने नुकतीच शासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
मंजूर झालेल्या विंधन विहिरी रामचंद कावळे यांचे घर, बिरसा मुंडा, राजु टेंभुर्णे यांचे घर, रामदास गायकवाड, संविधान चौक, कांचन हातझाडे, प्रभा रावेकर, कुंभारे सर, हनुमान मंदिर, शंकर खोब्रागडे, संतोष चांदेवार, सुनीता कोकोडे, बडोले, लालसिंग सोनाग्रे, कोंडवाड्यासमोर, नगर पंचायत परिसर, आनंदराव बागडे, शितला माता मंदिर परिसर, कमला परिहार, नरहरी परिहार, रोहीदास शहारे यांच्या घराशेजार करण्यात येणार आहे.
सदर २१ विंधन विहिरींवर २२ लाख २३ हजार ९८९ रुपयांचा खर्च अपेक्षीत असल्याचे सांगण्यात आले आहे. नगरात होणाऱ्या २१ विंधन विहिरींमुळे पाण्याच्या टंचाईवर मात करुन येईल असा आशावाद नगराध्यक्ष शहारे यांनी व्यक्त केला.

Web Title: 21 sanction of Fuel wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.