बारावीचे २१ हजार ३८१ विद्यार्थी सज्ज

By admin | Published: February 17, 2016 01:28 AM2016-02-17T01:28:23+5:302016-02-17T01:28:23+5:30

उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षा १८ फेब्रुवारीपासून २८ मार्चपर्यंत घेण्यात येत आहे. यावर्षी जिल्ह्यातील २१ हजार

21 thousand 381 students of the class XII are ready | बारावीचे २१ हजार ३८१ विद्यार्थी सज्ज

बारावीचे २१ हजार ३८१ विद्यार्थी सज्ज

Next

गोंदिया : उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षा १८ फेब्रुवारीपासून २८ मार्चपर्यंत घेण्यात येत आहे. यावर्षी जिल्ह्यातील २१ हजार ३८१ विद्यार्थी ६९ केंद्रांवरुन बारावीची परीक्षा देणार आहेत.
यासोबत इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्च ते २८ मार्चदरम्यान होणार असून २४ हजार ४९० विद्यार्थी ९७ केंद्रावरून परीक्षा देणार आहेत. विभागीय शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार, प्रत्येक केंद्रावर केंद्र संचालक, अतिरिक्त केंद्र संचालक तथा प्रत्येक तालुक्यातील एक परिरक्षक असे आठ परीरक्षक केंद्र नेमण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार थांबविण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे.
परीक्षा केंद्रापासून १०० मीटरच्या आत प्रतिबंधीत क्षेत्र व या क्षेत्रातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी यांचे लक्ष राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
सहा भरारी पथके
४परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सहा भरारी पथके व दक्षता समिती नेमलेली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे एक पथक, दुसरे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, तिसरे शिक्षणाधिकारी प्राथमिक, डायट प्राचार्य यांचे चौथे पथक, शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण यांचे पाचवा पथक तर सहावे पथक महिलांचे राहणार आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा हलगर्जीपणा
४बारावीची परीक्षा दोन दिवसांवर ठेवून ठेपली तरी कोणत्या तालुक्यात किती विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी केंद्र किती आहेत. पुनर्परीक्षार्थी किती, याची माहिती अद्याप गोंदिया शिक्षण विभागाला शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही. जिल्ह्यात किती उपद्रवी केंद्र किती आहेत याचीही माहिती पाठविलेली नाही. त्यामुळे कशा पध्दतीने बंदोबस्त मागावा असाही प्रश्न गटशिक्षणाधिकाऱ्यांना पडला आहे. दोन दिवसांवर परीक्षा आली असताना तालुकानिहाय परीक्षार्र्थींची संख्या शिक्षण विभागाकडे अजूनपर्यंत नाही यावरून या विभागाचा कारभार लक्षात येतो.

Web Title: 21 thousand 381 students of the class XII are ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.