जिल्ह्यातील २१ हजार कुटुंबे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 09:22 PM2018-04-30T21:22:00+5:302018-04-30T21:22:21+5:30

एकीकडे शासन उज्वला योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबाना वीज जोडणी उपलब्ध करुन देण्याचा दावा करीत आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील २१ हजार कुटुंब अद्यापही विजेच्या प्रकाशापासून वंचित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

21 thousand families in the dark | जिल्ह्यातील २१ हजार कुटुंबे अंधारात

जिल्ह्यातील २१ हजार कुटुंबे अंधारात

Next
ठळक मुद्देउदासीन कोण जनता की शासन : त्यांच्या घरात प्रकाश पोहचला नाही

नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एकीकडे शासन उज्वला योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबाना वीज जोडणी उपलब्ध करुन देण्याचा दावा करीत आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील २१ हजार कुटुंब अद्यापही विजेच्या प्रकाशापासून वंचित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे हे २१ हजार कुटुंब अजूनही अंधारात उज्वला योजनेचा प्रकाश शोधत असल्याचे चित्र आहे.
एकही गरीब कुटुंब वीज जोडणीपासून वंचित राहू नये, यासाठी मागील पाच सहा वर्षांपासून शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नरत आहे. यासाठी राजीव गांधी विद्युतीकरण योजना अमंलात आणून योजनेत काही निवडक जिल्ह्याची निवड केली होती. यामध्ये गोंदिया जिल्ह्याचा समावेश होता. जिल्ह्यातील दारिद्रय रेषेखालील यादीतील एक लाख कुटुंबाना नाममात्र १०० रूपयात वीज कनेक्शन देण्यात आले. या योजनेमुळे जिल्ह्यातील वीज चोरीच्या घटनांवर. परंतु अनेक ठिकाणी अद्यापही वीज चोरीला आळा बसला नसल्याची माहिती आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्यास्थितीत २१ हजार ३०० कुटुंबाकडे वीज कनेक्शन नसून ते अद्यापही दिव्याच्या प्रकाशाखाली दिवस काढत आहे. यापैकी अनेकांनी वीज कनेक्शनची मागणी केली मात्र त्यांना अद्यापही वीज जोडणी देण्यात आली नाही. वीज कनेक्शन अभावी गोंदिया तालुक्यातील १५० गावातील ५ हजार १४२ कुटुंब, तिरोडा तालुक्यातील ११४ गावातील ३ हजार २४७ कुटुंब, आमगाव तालुक्यातील ५९ गावातील १ हजार ९८३ कुटुंब, सालेकसा तालुक्यातील ८५ गावातील ३ हजार २९३ कुटुंब अंधारात राहात आहेत. देवरी तालुक्यातील १३४ गावातील ९२९ कुटुंब, गोरेगाव तालुक्यातील ९३ गावातील ३ हजार २७० कुटुंब, सडक-अर्जुनी तालुक्यातील १०८ गावातील १ हजार ६५३ कुटुंब अंधारात वास्तव्य करित आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३८ गावातील १ हजार ७८३ कुटुंब अंधारात राहात आहेत. जिल्ह्यातील ८८१ गावांतील २१ हजार ३०० कुटुंबाकडे वीज कनेक्शन नसल्याची माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
ग्राम स्वराज आणणार प्रकाश
जी कुटुंब अद्यापही वीज जोडणीपासून वंचित आहेत. त्यांना ग्राम स्वराज्य अभियानातंर्गत जोडणी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती आहे. परंतु पहिल्या टप्यात ग्राम स्वराज अभियानात जिल्ह्यातील फक्त तीन गावांची निवड करण्यात आली आहे. त्यात आमगाव तालुक्यातील कुंभारटोली, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी व तिरोडा तालुक्यातील घोगरा यांचा समावेश आहे. या तीन गावांतील विद्युत कनेक्शनचा तिढा प्राधान्याने सोडविण्यात येणार आहे. मात्र इतर गावातील कुटुंबाना वीज जोडणीसाठी अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.
अनेक वस्त्यांमध्ये वीज चोरी
शासनाकडून शंभर रूपयात वीज कनेक्शन देण्यात आले. जिल्ह्यातील एक लाख कुटुंबाना राजीव गांधी विद्युतीकरण योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र यानंतरही २१ हजारापेक्षा अधिक कुटुंब वीज जोडणीपासून वंचित आहेत. अनेक लोक विद्युत वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरी करतात. जे कनेक्शन मागतात त्यांना कनेक्शन देण्यासाठी विद्युत वितरण कंपनी टाळटाळ करते.

Web Title: 21 thousand families in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.