२१० पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या

By admin | Published: June 18, 2017 12:10 AM2017-06-18T00:10:49+5:302017-06-18T00:10:49+5:30

पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात उत्कृष्ट सेवा देता यावी यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ....

210 Administrative Officers of Police Officers | २१० पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या

२१० पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या

Next

सेवेसाठी बदल्या : शहरातील कर्मचारी नक्षलग्रस्त भागात
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात उत्कृष्ट सेवा देता यावी यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी २१० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या १५ जून रोजी केल्या आहेत. जिल्ह्यातील १६ पोलीस ठाणी, सशस्त्र दूरक्षेत्र, सी-६०, नक्षल विरोधी अभियान पथक व इतर विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी त्वरीत सोडण्याचे आदेश ठाणेदारांना देण्यात आले आहेत. बदलीवर कार्यमुक्त करताना संबधीत कर्मचाऱ्यांना पदग्रहणाचा काळ न उपभोगता तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे कर्मचारी रजेवर, सिक असतील त्यांना रजा कालावधीमध्येच बदलीवर मोकळे करावे. त्यांना बदलीसंबधीचा देय पदग्रहण काळ एक महिन्याचा आत उपभोगण्याची परवानगी संबंधीत ठाणेदार किंवा प्रभारी अधिकारी यांनी प्रशासकीय सोईनुसार द्यावी. जे कर्मचारी बदलीवर कार्यमुक्त होऊनही नवीन नेमणूकीच्या ठिकाणी हजर न झाल्यास त्यांचा कसूरी अहवाल पोलीस अधिक्षक कार्यालयाला पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दबाव आणणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई
बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पर्यायी व्यवस्थेची वाट पाहू नये. जे कर्मचारी बदलीवर हजर होण्यासाठी टाळाटाळ करतील तसेच त्यासाठी रुग्ण निवेदन करतील असा कर्मचाऱ्यांना रुग्ण निवेदनाच्या तारखेपासून बदलीवर मोकळीक करावे कोणतेही कर्मचाऱ्याने बदलीसंदर्भात निवेदन, विनंती अर्ज केले आहे. या कारणासाठी त्या बदलीवर सोडण्यासाठी विलंब करु नका असाही सूचना दिल्या आहेत. सेवा विषयक बाबीसाठी कोणत्याही व्यक्तीकडून खातेबाह्य दबाव, दडपण आणणाऱ्या कर्मचारीविरूध्द पोलीस नियमावली भाग १, नियम ४१३ तसेच सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रं. सीबीआर-१००६/प्र.क्र.-१२/०६११ दिनांक १७/०८/२००६ नुसार संशयीत कर्मचाऱ्याविरुध्द कठोर, शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिले आहे.

 

Web Title: 210 Administrative Officers of Police Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.