२२ अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:05 PM2017-11-18T22:05:35+5:302017-11-18T22:06:27+5:30

व्यसनमुक्त जिल्ह्याची स्वप्ने पाहणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात आता अवैध दारूचा महापूर वाहात आहे.

22 Impact on illegal liquor dealers | २२ अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई

२२ अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई

Next
ठळक मुद्देअवैध दारूचा महापूर : दारूबंदीसाठी तंमुसची मदत घ्यावी

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : व्यसनमुक्त जिल्ह्याची स्वप्ने पाहणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात आता अवैध दारूचा महापूर वाहात आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी अवैध दारू विक्रेत्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामीण भागातील गावागावात अवैध दारूचा महापूर वाहात असल्याची ओरड आहे. पोलिस विभाग दररोज कारवाई करीत असला तरीही अवैध दारूविक्रेते आपला व्यवसाय त्याच जोमाने चालवित करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
शुक्रवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत २२ अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया आसोली येथील पंचशीला रामेश्वर मेश्राम (५०) हिच्याकडुन ५ लीटर हातभट्टीची दारू, पांढराबोडी येथील केशरी मनोहर डहारे (४९) हिच्याकडुन २ नग देशी दारूचे पव्वे, नवेगावबांध पोलिसांनी जांभळी येथील शामराव चंद्रभान जनबंधू (३५) याच्याकडुन ७ नग देशी दारूचे पव्वे, केशोरी पोलिसांनी येळदा येथील लक्ष्मण दांपत मडावी (४०) याच्याकडुन ५ नग देशीदारूचे पव्वे, गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया संजयनगर पिंडकेपार येथील ध्रुपता तुळशीराम वाढई (६८) हिच्याकडून ४ लिटर हातभट्टीची दारु, दुर्गा जयप्रकाश बुरडे (४०) हिच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, गंगाझरी येथील राजकुमार सहेषराम शेंडे याच्याकडून ३ लिटर हातभट्टीची दारु, देवरी पोलिसांनी धोबीसराड येथील मोहन दयाराम फुल्लूके (५८) याच्याकडून ३ नग देशी दारुचे पव्वे, डुग्गीपार पोलिसांनी भुसारीटोला येथील श्रीपत सदाराम मोटघरे (६५) याच्याकडून ३ नग देशी दारुचे पव्वे, तिरोडा पोलिसांनी मुंडीकोटा येथील देवीबाई हिंदीमल मोटघरे (५०) हिच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु,शास्त्री वार्ड तिरोडा येथील पंचफुला दुधराम राऊत (४५) याच्याकडून ७ लिटर हातभट्टीची दारु, आमगाव पोलिसांनी मरारटोला बकरामुंडी येथील महेंद्र बुधराम रामटेके (५२) याच्याकडून १४ नग देशी दारुचे पव्वे, रामनगर पोलिसांनी आंबेडकर चौक गोंदिया येथील सुखचंद सुरजलाल हट्टेवार (४७) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, इंदिरानगर कुडवा येथील किरण सुरज बावनथडे (४५) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, रावणवाडी पोलिसांनी सावरी येथील भारती खुशरंग मंडये (३०) हिच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, सत्यप्रकाश बसंतराय भगत (२४) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, गोरेगाव पोलिसांनी कुºहाडी येथील देवाजी दौलत सेऊतकर (६७) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, दवनीवाडा पोलिसांनी पिपरिया येथील माणिक भाऊलाल देवगडे (२८) याच्याकडून ७ लिटर हातभट्टीची दारु, तिरोडा पोलिसांनी करडी बुज. येथील अशोक उर्फ प्रशांत भास्कर मेश्राम (४०) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, चिचगड पोलिसांनी रामगड सुकडी येथील थानीराम शिवपाल बोरकर (३५) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, अर्जुनी मोरगाव पोलिसांनी माहुरकुडा येथील राजकुमार खेमराज वंजारी (४३) याच्याकडून ६ नग देशी दारुचे पव्वे, सालेकसा पोलिसांनी निंबा येथील मनोज राधेश्याम भगत (२८) याच्याकडून ६ नग देशी दारुचे पव्वे जप्त करण्यात आले. सदर आरोंपीविरुद्ध मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: 22 Impact on illegal liquor dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.