लिपीकाच्या घरून २.२१ लाखाची चोरी; तासाभरातच आरोपीला मुद्देमालासह अटक 

By नरेश रहिले | Published: December 1, 2023 07:08 PM2023-12-01T19:08:51+5:302023-12-01T19:09:22+5:30

ही चोरी आरोपी फरहान ईशाक कुरैशी (१९) रा. गौतमनगर, गोंदिया याच्या बरोबर एका विधी संघर्षीत बालकाने केल्याची कबुली फरहाण याने दिली आहे.

2.21 lakh stolen from clerk's house Within an hour, the accused was arrested along with the material | लिपीकाच्या घरून २.२१ लाखाची चोरी; तासाभरातच आरोपीला मुद्देमालासह अटक 

लिपीकाच्या घरून २.२१ लाखाची चोरी; तासाभरातच आरोपीला मुद्देमालासह अटक 

गोंदिया : येथील नगर परिषदमध्ये लिपीक म्हणून कार्यरत प्रदीप कृष्णबिहारी मिश्रा (५३) रा. बाजपेयी वार्ड, आंबेडकर हायस्कूलच्या पाठीमागे, गौतमनगर, गोंदिया हे आपल्या पत्नीसह कार्यक्रमाकरीता बाहेर गेले असतांना घरातील पहील्या माळ्यावरील बेडरुममधील कपाटात डब्यात ठेवलेले २ लाख २१ हजार १०० रूपये किंमतीचे दागिणे २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता चोरी केले. त्या प्रकरणाची तक्रार येताच गोंदिया शहर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून अवघ्या अर्ध्या तासातच आरोपीला अटक केली.

शहरातील बाजपेयी वॉर्ड आंबेडकर वॉर्ड स्कूलच्या पाठीमागे असलेल्या गौतमनगर परिसरातील रहिवासी नगर परिषदेचे लिपीक प्रदीप कृष्णबिहारी मिश्रा यांच्या घरातून २४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान चोरट्यांने दोन लाख २१ हजार १०० रुपयांचे दागिने लंपास केले होते. चोरीला गेलेल्या दागिन्यात १२ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी किंमत ४८ हजार रुपये, १३ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी किंमत ५२ हजार रुपये, १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा पांचाळी हार किंमत ४० हजार रुपये, प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या किंमत ६० हजार रुपये, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची एक नथ किंमत १२ हजार रुपये व २०० ग्रॅम वजनाच्या पायल किंमत नऊ हजार १०० रुपये यांचा समावेश आहे.

या घटनेसंदर्भात शहर पोलिसांनी ३० नोव्हेंबर रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४५४, ४५७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे गोंदिया शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी तासाभरातच आरोपी फरहान ईशाक कुरैशी (१९) रा. गौतमनगर, गोंदिया याला अटक केली. ही कारवाई पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ताजणे यांच्या मार्गदर्शनात शहरचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस हवालदार जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, कवलपालसिंह भाटीया, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, महिला पोलीस हवालदार रिना चौव्हाण, पोलीस शिपाई अशोक रहांगडाले, दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी केली केली आहे.

या चोरीत विधी संघर्षीत बालकाचा समावेश
ही चोरी आरोपी फरहान ईशाक कुरैशी (१९) रा. गौतमनगर, गोंदिया याच्या बरोबर एका विधी संघर्षीत बालकाने केल्याची कबुली फरहाण याने दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीजवळून २ लाख २१ हजार १०० रूपयाचा माल हस्तगत केले. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील करीत आहेत.

Web Title: 2.21 lakh stolen from clerk's house Within an hour, the accused was arrested along with the material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.