रेल्वे गाड्यांतील अनाधिकृत फेरीवाले आणि तृतीयपंथींना २२.४३ लाखाचा दंड

By नरेश रहिले | Published: January 1, 2024 08:31 PM2024-01-01T20:31:55+5:302024-01-01T20:32:23+5:30

वर्षभरात ७०२ वेळा ओढली रेल्वेची साखळी: ज्वलनशिल पदार्थ वाहतूक करणाऱ्या २१ घटना उघडकीस

22.43 lakh fine on unauthorized hawkers and third parties in railway trains | रेल्वे गाड्यांतील अनाधिकृत फेरीवाले आणि तृतीयपंथींना २२.४३ लाखाचा दंड

रेल्वे गाड्यांतील अनाधिकृत फेरीवाले आणि तृतीयपंथींना २२.४३ लाखाचा दंड

गोंदिया: रेल्वे संरक्षण दल, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यागोंदिया रेगल्वे सुरक्षा बलाने सन २०२३ या वर्षभरात केलेल्या कारवाईत अनधिकृत फेरीवाले, विक्रेते आणि पैसे मागणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. वर्षभरात २ हजार ९०८ बेकायदेशीर विक्रेते व तृतीयपंथी यांना पकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना २२ लाख ४३ हजार ४५० रुपयांचा दंड ठोठवला आहे. तो दंड वसूल करण्यात आला.

रेल्वे प्रवाशांचा सुरक्षित प्रवास करण्याच्या उद्देशाने विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली २०२३ मध्ये रेल्वे कायद्याच्या विविध कलमांतर्गत सतत मोहीम राबविली. रेल्वे आरक्षित ई-तिकीटांची बेकायदेशीर दलाली, रेल्वेस्थानक आणि गाड्यांमध्ये खाद्यपदार्थांची अनाधिकृतपणे विक्री, विनाकारण चेन पुलिंग आणि गाड्यांमधील ज्वलनशील पदार्थांची अनाधिकृत वाहतूक रोखण्यासाठी या मोहिमेअंतर्गत तपासणी व कायदेशीर कारवाई करण्यात आली. वर्षभरात ८ हजार ७६३ जणांवर कारवाई करण्यात आली. यात ८ हजार ७६४ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गोंदिया रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक विनोदकुमार तिवारी यांनी दिली आहे.

ई-तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या ९८ जणांना पकडले
रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये कारवाई करून एकूण ९६ प्रकरणांमध्ये ९८ दलालांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने ३८ प्रकरणांमध्ये निकाल देऊन ३ लाख ५६ हजात रूपये दंड ठोठावला. तर १८ प्रकरणे प्रलंबित असून ४० प्रकरणांचा तपास प्रलंबित आहे.

चेन पुलिंग करणाऱ्या ६७७ जणांना पकडले
विनाकारण ट्रेनमध्ये साखळी ओढताना आढळून आलेल्यांवर कारवाई करताना ७०२ प्रकरणात एकूण ६७७ जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २ लाख ८३ हजार ७० रूपये त्यांच्यावर ठोठावला.

ज्वलनसील पदार्थ नेणाऱ्या २४ जणांना अटक
रेल्वेस्थानक आणि रेल्वे गाड्यांमध्ये ज्वलनशील पदार्थाची अनधिकृत वाहतूक केल्याच्या २१ प्रकरणांमध्ये एकूण २४ जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना एकूण १४ हजाराचा दंड ठोठावला.

Web Title: 22.43 lakh fine on unauthorized hawkers and third parties in railway trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.