दोन दिवसांत २३ फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:38 PM2018-07-17T23:38:14+5:302018-07-17T23:38:44+5:30

सोमवारी व मंगळवारी आलेल्या संततधार पावसामुळे राज्य परिवहन मंडळाच्या गोंदिया आगारातील तब्बल २३ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर काही फेऱ्यांच्या प्रवास अर्धवटच झाला. त्यामुळे गोंदिया आगाराचा एक लाखाच्या वर नुकसान झाले.

23 rounds canceled in two days | दोन दिवसांत २३ फेऱ्या रद्द

दोन दिवसांत २३ फेऱ्या रद्द

Next
ठळक मुद्देगोंदिया आगार : एसटीचे लाखांवर नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सोमवारी व मंगळवारी आलेल्या संततधार पावसामुळे राज्य परिवहन मंडळाच्या गोंदिया आगारातील तब्बल २३ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर काही फेऱ्यांच्या प्रवास अर्धवटच झाला. त्यामुळे गोंदिया आगाराचा एक लाखाच्या वर नुकसान झाले.
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रहदारी बाधित झाली. एसटी आगारालाही काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत तर काही ठिकाणचे रस्ते पूर्णत: खराब झाले आहेत. त्यामुळे आगाराला काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. मंगळवारी (दि.१७) संततधार पावसामुळे तब्बल १९ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
यात आमगाव-देवरी सहा फेऱ्या, कामठा-गिरोला दोन फेऱ्या, कामठा-आमगाव चार फेऱ्या, आमगाव-सालेकसा दोन फेऱ्या, दासगाव-किन्ही तीन फेऱ्या व बोरगाव-देवरी दोन फेऱ्यांचा समावेश आहे. तसेच पावसामुळे याच दिवशी पाच फेऱ्यांचा प्रवास अर्धवटच झाला. या सर्व फेऱ्या रद्द झाल्याने गोंदिया आगाराचे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगारातील कर्मचाऱ्यांनी दिली.
सोमवारी गोंदिया आगाराला चार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे १५ ते २० हजार रूपयांचे नुकसान झाले. या रद्द फेऱ्यांमध्ये गोंदिया-बोळूंदा, गोंदिया-गिरोला, निंबा व तेढा यांचा समावेश आहे.
पावसामुळे मानव विकासच्या फेऱ्या रद्द
मानव विकास कार्यक्रमांतर्गत गोंदिया आगारातून एकूण २८ ‘स्कूल बसेस’ गोंदिया, गोरेगाव, आमगाव व सालेकसा या चार तालुक्यांसाठी धावतात. मंगळवारी सकाळच्या सुमारास काही स्कूल बसेस सोडण्यात आल्या होत्या. मात्र वरिष्ठ स्तरावरून पावसामुळे शाळांना सुट्टी असल्याचे निर्देश प्राप्त झाल्याने गोंदिया आगाराने या सर्व स्कूल बसेसचा प्रवास रद्द करण्यात आला.

Web Title: 23 rounds canceled in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.