२३ गावांची आरोग्य सेवा सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:57 PM2018-03-05T23:57:38+5:302018-03-05T23:57:38+5:30

ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता शासनाच्या आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये. रुग्णांना गावखेड्यात आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात. यासाठी शासनाने गावा-गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली.

23 villages health service on the saline | २३ गावांची आरोग्य सेवा सलाईनवर

२३ गावांची आरोग्य सेवा सलाईनवर

googlenewsNext
ठळक मुद्देअस्थाई डॉक्टर सांभाळतो कारभार : दोन वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांची वाणवा

अमरचंद ठवरे ।
आॅनलाईन लोकमत
बोंडगावदेवी : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता शासनाच्या आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये. रुग्णांना गावखेड्यात आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात. यासाठी शासनाने गावा-गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली. मात्र अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने रुग्णांना उपचार मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. एकंदरीत २३ गावातील आरोग्य सेवा सलाईवर असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागातील कोणताही रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, याठी शासन स्तरावरुन विविध उपक्रम राबविले जात आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांच्या रिक्त पदांमुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ पांढरा हत्ती ठरत आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चान्ना-बाक्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील २ वर्षांपासून प्रशिक्षीत वैद्यकीय अधिकाºयांची वाणवा आहे. परिणामी २३ गावांची आरोग्य सेवा कोलडमली आहे. तर एक आयुर्वेदिक दवाखाना अस्थाई वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर सुरू आहे. चान्ना-बाक्टी येथे मागील काही वर्षापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांसाठी सर्व सोयी सुविधा युक्त निवासस्थाने बांधण्यात आली. मात्र त्यांचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत बोंडगावदेवी, सिलेझरी, बाक्टी, निमगाव, भिवखिडकी, पिंपळगाव, चान्ना, डोंंगरगाव या ८ उपकेंद्रामधील २३ गावांचा समावेश आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रात या २३ गावातील रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्याने त्यांना उपचार न घेताच परतावे लागत आहे. मागील २ वर्षांपासून कायम स्वरुपी वैद्यकीय अधिकाऱ्याचा अभाव आहे.
प्रशिक्षीत डॉक्टरांची नियुक्तीच न झाल्याने परिसरातील गोरगरीब जनतेला आरोग्य सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे.
अस्थाई डॉक्टरवर भार
प्राथमिक आरोग्य केंद्रामधील कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. राजीव डोबे यांची दोन वर्षांपूर्वी बदली झाली. तेव्हापासून त्यांची जबाबदारी बोंडगावदेवी येथील जि.प.आयुर्वेदिक दवाखान्यात अस्थाई वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. कुंदन कुलसुंगे सांभाळीत आहेत. त्यांना दिवसरात्र आरोग्य केंद्रात सेवा द्यावी लागत असल्याने बोंडगावदेवी आयुर्वेदिक दवाखाना बंद ठेवावा लागतो. डॉ. कुलसुंगे यांना प्राथमिक आरोग्य केंद्राचा डोलारा सांभाळतना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य पदे रिक्त
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गट अ १ पद, वैद्यकीय अधिकारी गट ब १ पद अशी २ पदे मंजूर आहेत. मागील २ वर्षापासून एकही कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी नाही. ग्रामीण भागात प्रशिक्षित डॉक्टरांचा अभाव असल्याने चान्ना प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवेचे तीन-तेरा वाजले आहे. सध्या स्थितीत वाहन चालक, कनिष्ठ लिपीक, औषधी वितरक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका व परिचर आदी कर्मचाºयांची पदे रिक्त आहे.

Web Title: 23 villages health service on the saline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.