२३२ बालमजूरांसाठी ७ विशेष प्रशिक्षण केंद्र्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2017 01:22 AM2017-06-12T01:22:03+5:302017-06-12T01:22:03+5:30

बालपण मनुष्याच्या जीवनात आनंदाचे क्षण देणार्े असते. कसलीही चिंता, कसलीही जबाबदारी राहत नाही.

232 7 Special Training Centers for Child Labor | २३२ बालमजूरांसाठी ७ विशेष प्रशिक्षण केंद्र्र

२३२ बालमजूरांसाठी ७ विशेष प्रशिक्षण केंद्र्र

Next

शिष्यवृत्ती वाढवा : ११ वर्षात १६२१ बालमजूर मुख्य प्रवाहात
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बालपण मनुष्याच्या जीवनात आनंदाचे क्षण देणार्े असते. कसलीही चिंता, कसलीही जबाबदारी राहत नाही. आपल्याच धुंदीत राहणाऱ्या बालकांवर एकाएक पोटासाठी धोक्याच्या ठिकाणीही काम करून पोटाची खळगी भरण्याची पाळी येत असेल तर यापेक्षा दुर्देव नाही. गोंदिया जिल्ह्यात बालमजूरी करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने मागील ११ वर्ष केलेल्या प्रयत्नांमुळे १६२१ बालकांना मुख्या प्रवाहात आणण्यात आले. तर २३२ बाल मजूृरांसाठी ७ नविन विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहेत. जिल्ह्यात कचरा गोळा करणारे, लोखंड जमा करून विक्री करणारे, हॉटेल व इतर व्यवसायात काम करणारे, भीक मागणारे बालक आहेत. आई-वडीलांच्या दुर्लक्षामुळे मांग गारुडी, नाथजोगी, मुस्लीम फकीर यांची मुले बालमजूरीकडे वळतात. या बालमजूरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात १२ प्रशिक्षण केंद्र आहेत.
यात ३८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गोंदिया तालुक्याच्या गौतमनगर, संजय नगर, कुडवा, गोंडीटोला व अदासी, सालेकसा तालुक्यातील बाबाटोली, मुरकुडोहदंडारी व तिरोडा तालुक्याच्या काचेवानी, नवरगाव, मुंडीकोटा व घोघरा येथे प्रशिक्षण केंद्र सुरू आहेत.

गोंदिया जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणात २३२ बालमजूर असल्याचे लक्षात आले. त्यांच्यासाठी ७ नविन विशेष प्रशिक्षण केंद्र उघडले जाणार आहे. सर्वेक्षणात आढळलेल्या १४ ते १८ वर्षातील बाल मजूरांना व्यावसायिक प्रशिक्षण, जिल्हा कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
उज्वल लोया
सहायक कामगार आयुक्त गोंदिया

२२०० बालकामगारांना पकडले
बाल कामगार कार्यालयाद्वारे सन २००६ पासून आतापर्यंत २२०० बाल कामगारांना पकडण्यात आले. यात १६२१ बाल कामगार प्रकल्प समितीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यात आले. त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी नियमीत शाळेत पाठविले जात आहे. यातील बहुतांश बालके आपल्या पायावर उभे झाले आहेत. काही मुले उच्च शिक्षण घेत आहेत.
फक्त १५० रूपये शिष्यवृत्ती
बाल मजूर दररोज १५० ते २०० रूपये कमवितात. सरकारद्वारे त्यांना प्रत्येक महिन्याला १५० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यांच्या शिष्यवृत्तीत शासनाने वाढ करण्याची मागणी होत आहे. बालमजूरीसाठी आईवडीलही तेवढेच जबाबदार आहेत. आई वडीलांच्या व्यसनामुळे बालमजूरी फोफावत आहे.

Web Title: 232 7 Special Training Centers for Child Labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.