आरटीईच्या ८७७ जागांसाठी २३८० अर्ज (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:27 AM2021-04-06T04:27:41+5:302021-04-06T04:27:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९मधील कलम १२ (१) (सी)नुसार वंचित व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९मधील कलम १२ (१) (सी)नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या शाळा बंद आहेत. मात्र, आरटीईच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील ८७९ जागांसाठी २ हजार ३८० अर्ज आले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२साठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील १४५ शाळांमधील ८७७ जागांसाठी २ हजार ३८० अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननी करून सोडतीव्दारे निवड केली जाणार आहे. राज्य शासन पहिली सोडत ६ एप्रिल रोजी काढत आहे. या सोडतीची प्रतीक्षा अर्ज करणाऱ्या सर्व पालकांना आहे. आपल्या मुलाची निवड होण्यासाठी पालक प्रतीक्षेत आहेत. मुलाचा प्रवेश एकदा झाला तर ‘नो टेंशन’ असाच शब्द पालकांच्या तोंडातून निघत आहे. कोरोनामुळे यंदाही प्रवेश प्रक्रिया लांबणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.
बॉक्स
तालुका---- शाळा --- जागा---- अर्ज
आमगाव- ११--८०--२६४
अर्जुनी-मोरगाव - १३--१००--१५९
देवरी - १०--४४-- १०५
गोंदिया - ५८--३४९--११८८
गोरेगाव - १५--७९--१९३
सडक-अर्जुनी - १०--४१--९५
सालेकसा - ७--५१--७७
तिरोडा - २१--१३३--२९९
एकूण - १४५--८७७--२३८०
................
आरटीई अंतर्गत जिल्ह्यात शाळांची नोंदणी - १४५
किती शाळा - १४५
किती अर्ज - २३८०
...............
आता लक्ष लॉटरीकडे
सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रासाठी आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी राज्यस्तरावरून ही लॉटरी काढण्यात येत आहे. यासाठी ६ एप्रिल रोजी पहिली लॉटरी काढण्यात येत आहे. या लॉटरीच्या प्रतीक्षेत सगळेच आहेत. पहिल्याच लॉटरीत आपल्या पाल्याचे नाव यावे व प्रवेश घेऊन आपण सुटकेचा श्वास घ्यावा, असा मानस अनेक पालकांचा आहे.
......
कोट
शासनाच्या धोरणानुसार व वेळोवेळी आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून आरटीईची प्रवेश प्रक्रिया होत आहे. आम्हाला आलेल्या सूचना पालकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आमचा विभाग करतो. सोडतीनंतर प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.
- राजकुमार हिवारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया.
......
तर मोठ्या शाळेचे स्वप्नही पाहू शकत नाही
१) आम्ही मोलमजुरी करतो. त्यामुळे आपल्या मुलांना खासगी शाळेत शिकवणे ही गोष्ट आमच्या कल्पनेबाहेरची आहे. परंतु, शासनाने दिलेल्या योजना आपल्या पदरी पडतात काय, यासाठी आम्ही नशीब आजमावत आहोत.
- कलाबाई नेवारे, पालक, आमगाव
........
२) तुटपुंज्या मजुरीत पोट भरावे की मुलांच्या शिक्षणावर पैसा खर्च करावा, हे समजत नाही. नामवंत शाळांमध्ये शिक्षण घेऊन श्रीमंताची मुले हुशार होतील आणि आमच्या मुलांना नेहमीच्याच पडक्या शाळेत पाठवावे लागते. परंतु, सरकारने आमच्या मुलांचे नशीब आजमावण्यासाठी आरटीई अंतर्गत प्रवेश देण्याचे ठरवल्याने एकदा नशीबही आजमावत आहोत.
- श्रीराम भांडारकर, पालक, किडंगीपार
.............
शासनाने आरटीई अंतर्गत गोरगरिबांच्या मुलांना मोफत प्रवेश देण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपण अर्ज केला. परंतु, पाल्याला लॉटरी लागते किंवा नाही, याकडे आता आपले लक्ष आहे. ६ एप्रिल रोजी होणाऱ्या या सोडतीकडे आपले लक्ष आहे.
शुध्दोधन रंगारी, पालक, बाम्हणी